बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलले कर्ज
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:12+5:302015-02-14T23:52:12+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलले कर्ज

बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलले कर्ज
ब ावट कागदपत्रांच्या आधारे उचलले कर्जनागपूर : वाहन खरेदीसाठी बनावट करारनामा आणि कागदपत्र तयार करून सोनल सूरज ठाकरे (३१), सूरज अण्णा ठाकरे रा. शारदा अपार्टमेंट समाजभूषण सोसायटी फ्लॅट नं. १०१, मनीषनगर यांनी रामदासपेठेतील स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगनमत करून इनोव्हा गाडी क्रमांक एम. एच. ३१, डीसी ५३०४ खरेदीसाठी बनावट करारनामा, कागदपत्र सादर करून रामदासपेठच्या स्टेट बँक ऑफ इंडियातून ६.९० लाखाचे कर्ज मंजूर करून घेतले. कर्जाची रक्कम बँकेने वाहन मालक स्वप्निल इलेक्ट्रीक वर्क्सच्या नावाने चेकने दिली. त्यावर स्वप्निल इलेट्रीक वर्क्सचा प्रोपायटर सूरज ठाकरे असल्याचे बनावट कागदपत्र अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक अजनी चौक येथे सादर करून त्या नावाने खाते उघडून रक्कम काढली. कर्जातील ३ लाख ३ हजार १७५ रुपयाची रक्कम त्यांनी भरली. परंतु उर्वरित हप्ते न भरल्यामुळे नरेंद्र बळवंत बावनगडे (५९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.