शेतकर्यांसाठी कर्ज काढू; चारा, पाणी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूरच्या पाहणी दौर्यात आश्वासन लातूर : मराठवाड्यात अपुर्या पावसामुळे चारा,
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर मंगळवारी दुपारी २ वाजता आगमन झाले़ यावेळी त्यांच्या समवेत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ़ दिपक सावंत, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी आदींची उपस्थिती होती़ विमानतळावर लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खा़डॉ़सुनिल गायकवाड, आ़संभाजीराव पाटील निलंगेकर, आ़सुधाकर भालेराव, जि़प़चे अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, विभागीय आयुक्त डॉ़ उमाकांत दांगट, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा पोलिस अधिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आदींनी त्यांचे स्वागत केले़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांची निवेदने स्विकारली़ त्यानंतर मुख्यमंत्री व अन्य मंत्री लातूर

शेतकर्यांसाठी कर्ज काढू; चारा, पाणी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूरच्या पाहणी दौर्यात आश्वासन लातूर : मराठवाड्यात अपुर्या पावसामुळे चारा,
म ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर मंगळवारी दुपारी २ वाजता आगमन झाले़ यावेळी त्यांच्या समवेत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ़ दिपक सावंत, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी आदींची उपस्थिती होती़ विमानतळावर लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खा़डॉ़सुनिल गायकवाड, आ़संभाजीराव पाटील निलंगेकर, आ़सुधाकर भालेराव, जि़प़चे अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, विभागीय आयुक्त डॉ़ उमाकांत दांगट, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा पोलिस अधिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आदींनी त्यांचे स्वागत केले़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांची निवेदने स्विकारली़ त्यानंतर मुख्यमंत्री व अन्य मंत्री लातूर जिल्ाच्या दौर्यावर रवाना झाले़ चाकूर तालुक्यातील आष्टामोड ते आष्टा दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला़ यावेळी आ़ विनायकराव पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सरपंच श्रीमंत शेळके, गुणवंत पाटील, अशोक चिंते, गणेश हाके, बालाजी पाटील चाकूरकर, मेघराज बाहेती, सिद्धेश्वर पवार, माजी आग़ोविंद केंद्रे यांच्यासह ५०० ते ६०० शेतकरी, शेतमजुरांची उपस्थिती होती़ पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थितीचा पाडा उपस्थितांनी मुख्यमंत्र्यासमोर मांडला़ यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पाणीटंचाईचे नियोजन शासनाने केले आहे़ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १० टक्के जास्तीचे नियोजन केले आहे़ चारा छावण्या सुरु करण्यात येत आहेत़ काही ठिकाणी सुरुही झाल्या आहेत़ दुभत्या जनावरांसाठी पशुपालकांच्या दावणीला चारा देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे़ सध्या पशुंची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे़ चार्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेजारच्या राज्यातून चारा उपलब्ध केला जाईल़ पिकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे़ मजुरांना कामे नाहीत़ ती उपलब्ध करुन दिली जातील़ तसेच शेतकर्यांच्या पाल्यांची शैक्षणिक फीस पूर्ण माफ केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले़ज्या बळीराजाकडून आपणाला धान्य मिळते़ त्या बळीराजाच्या घरात आता धान्य नाही़ त्यामुळे शेतकर्यांना अन्न सुरक्षा योजनेतून ३ रुपये किलो दराने गहू व २ रुपये किलो दराने तांदुळ देण्यास सुरुवात झाली आहे़ मराठवाड्यातील आठ आणि विदर्भातील सहा अशा एकूण १६ जिल्ातील शेतकर्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले़