शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे मुख्यमंत्री म्हणतात, कर्जमाफीनं शेतकरी सुस्तावतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 09:02 IST

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीबद्दल हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचं विधान

चंदिगड: कर्जमाफीमुळे शेतकरी सुस्तावतात, असं विधान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केलं आहे. भाजपाकडे कर्जमाफीची योजना नसल्याचा राजकीय फटका हरियाणात लोकसभा निवडणुकीत बसणार नाही, असा दावा त्यांनी केला. खट्टर यांनी काँग्रेसच्या न्याय योजनेवरदेखील भाष्य केलं. न्याय योजनेसाठी निधीची स्वतंत्र तरतूद असणार नाही. इतर सर्व योजना बंद करुन न्याय योजना लागू करण्यात येईल, असादेखील दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीवर मनोहर लाल खट्टर यांनी विस्तृत भाष्य केलं. 'हरियाणात कर्जमाफी योजना नसल्याचा कोणताही नकारात्मक परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसणार नाही. शेतकरी परिपक्व झाला आहे. कर्जमाफी देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव देण्याचे प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत. पिकाला उत्तम हमीभाव दिला जात आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली. मात्र कोणत्याही प्रकारची सूट दिलेली नाही. शेती व्यवसाय अधिकाधिक लाभदायक करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा फायदा याआधी कधीही पाहिलेला नव्हता,' असा दावा खट्टर यांनी केला. एखाद्याला मोफत देण्याची सवय लावली, की मग ती व्यक्ती आळशी होते, अशा शब्दांत त्यांनी कर्ममाफीवर भाष्य केलं. 'हरियाणातल्या शेतकरी समुदायाला त्यांच्या पुढील आर्थिक संकटं संपवायची आहे. एकदा लोकांना फुकटात काही मिळायची सवय लागल्यावर ते सुस्तावतात. ते इथून तिथून कर्ज घेऊ लागतात. ते आर्थिक नियोजन करत नाहीत. या प्रकारची योजना (कर्जमाफी) काही राज्यांमध्ये यशस्वी होऊ शकते. कारण तिथली परिस्थिती तशी आहे. मात्र हरियाणात ही योजना यशस्वी होऊ शकत नाही,' असं खट्टर म्हणाले.  

टॅग्स :FarmerशेतकरीHaryanaहरयाणा