शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ५ टक्के व्याजाने लाखभर कर्ज; ‘विश्वकर्मा योजने’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 06:12 IST

३० लाख कुटुंबांना होणार थेट फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशातील लाखो छोट्या व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षणासह आर्थिक हातभार देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेद्वारे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ५ टक्के व्याजदराने उपलब्ध केले जाईल. सरकार या योजनेवर ५ वर्षांत १३ हजार कोटी रुपये खर्च करणार असून त्याचा ३० लाख कुटुंबांना त्याचा थेट फायदा होणार  आहे.

रेल्वेवाहतूक आणखी वेगवान होण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडीविषयक समितीने सात बहुपदरी रेल्वेमार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी ३२,५०० कोटी खर्च येणार आहे. तसेच शहरी बससेवांचा विस्तार करण्यासाठी मंत्रिमंडळाने पीएम ई-बससेवा योजनेला मंजुरी दिली.

३० लाख कुटुंबांना विश्वकर्मा योजनेद्वारे थेट फायदा होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. या योजनेंतर्गत बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.

५.२५ लाख तरुणांना मिळणार नव्या स्किल्स

डिजिटल इंडिया या योजनेच्या विस्तारीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या कामांसाठी १४,९०३ कोटी रुपये खर्च होतील. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, डिजिटल इंडियाच्या विस्ताराद्वारे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील ५.२५ लाख लोकांची कौशल्यवृद्धी केली जाणार आहे.

कुणाला फायदा? 

चर्मकार, गवंडी, सोनार, शिंपी, सुतार, शिल्पकार, जाळी तयार करणे, कुंभार, टेलर, लोहार यासह एकूण १८ पारंपरिक कामे करणाऱ्यांसाठी विश्वकर्मा योजना आणण्यात आली आहे.

कसा मिळेल योजनेचा लाभ?

प्रशिक्षणादरम्यान दररोज ५०० रुपये मानधनही दिले जाणार आहे. नवी साधने खरेदी करण्यासाठी सरकार १५ हजार रुपयांची मदत करणार आहे. कामगारांना १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात २ लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. याचवेळी सरकार ब्रँडिंग, ऑनलाइन मार्केट ॲक्सेस यासाठी मदत करेल. प्रथमच १८ पारंपरिक व्यापाऱ्यांचा समावेश केला आहे.

रेल्वे प्रवास होणार सुसाट

बहुपदरी रेल्वेमार्गामुळे एखाद्या एक्स्प्रेससाठी दुसऱ्या गाडीला सायडिंगला टाकण्याचे प्रमाण कमी होईल आणि रेल्वे प्रवास आणखी सुसाट होईल. तसेच देशातील रेल्वे जाळ्यांमध्ये आणखी २,३३९ किमी रेल्वेमार्गाची भर पडणार आहे. रेल्वे वाहतुकीची क्षमतावाढीसह गर्दी कमी होण्यास मदत होईल.

१६९ शहरांत धावणार १० हजार ई-बस

विविध शहरांतील बससेवेचा आवाका वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘पीएम ई-बससेवा’ या योजनेला मंजुरी दिली. संघटित बस सेवा नसलेल्या शहरांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये १६९ शहरांमध्ये १० हजार ई-बस चालविल्या जातील. या योजनेसाठी ५२,६१३ कोटी रुपये खर्च येणार आहे.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार