शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मोरॅटोरियम प्रकरण: सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 04:20 IST

मोरॅटोरियम काळात दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज सरकार भरेल, असे केंद्राच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पीठापुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांसाठी देण्यात आलेल्या ‘मोरॅटोरियम’प्रकरणी (कर्ज हप्ते न भरण्याची सवलत) २ ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात अनेक बाबींचा उल्लेखच नाही, त्यामुळे १३ ऑक्टोबरपर्यंत सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्यात यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला सोमवारी दिले.मोरॅटोरियम काळात दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज सरकार भरेल, असे केंद्राच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पीठापुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शाह यांचा या न्यायपीठात समावेश आहे.न्यायालयाने म्हटले की, याप्रकरणी के. व्ही. कामत समितीने ७ सप्टेंबर रोजी सादर केलेल्या अहवालात क्षेत्रनिहाय उपाय सुचविले आहेत. त्याबाबत प्रतिज्ञापत्रात मौन बाळगण्यात आले आहे. याशिवाय आपल्याच धोरणात्मक उपायांच्या अंमलबजावणीचा तपशीलही प्रतिज्ञापत्रात नाही. विविध याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या कित्येक मुद्यांवरही प्रतिज्ञापत्रात काहीच खुलासा केलेला नाही. त्यामुळे सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्यात यावे.१ मार्च ते ३१ आॅगस्ट यादरम्यान देण्यात आलेल्या मोरॅटोरियमच्या काळातील थकीत कर्जावर बँकांनी चक्रवाढ व्याज (व्याजावर व्याज) लावल्यामुळे अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. एकीकडे मोरॅटोरियमची सवलत द्यायची आणि दुसरीकडे व्याजावर व्याज लावायलाही बँकांना परवानगी द्यायची, अशी दुटप्पी भूमिका सरकारला घेता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. बँकांना उर्वरित कर्जावरील व्याजावरील व्याज लावण्यास बंदी करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.कामत समितीच्या शिफारशी पटलावर ठेवाके. व्ही. कामत समितीने कर्ज पुनर्रचनेबाबत केलेल्या शिफारशी पटलावर ठेवण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने दिले. याशिवाय मोरॅटोरियमबाबत आजपर्यंत जारी करण्यात आलेल्या सर्व अधिसूचना आणि परिपत्रकेही पटलावर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय