गाढ झोपेत असलेल्या 25 जणांना भरधाव ट्रकनं चिरडलं, 8 जणांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 12:59 PM2021-08-09T12:59:15+5:302021-08-09T12:59:33+5:30

Road accident in gujrat: गुजरात सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये नुकसान भरपाई

Loaded truck rammed into slums; 25 crushed, 8 killed | गाढ झोपेत असलेल्या 25 जणांना भरधाव ट्रकनं चिरडलं, 8 जणांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी

गाढ झोपेत असलेल्या 25 जणांना भरधाव ट्रकनं चिरडलं, 8 जणांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी

googlenewsNext


अमरेली: गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव ट्रक रस्त्याच्या किनारी असलेल्या झोपडपट्टीत घुसल्याने 8 जणांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी आहेत. यातील 4 जणांची परिस्थिती नाजूक आहे. या अपघातानंतर सर्व जखमींना सांवरकुंडलाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

स्थानिकांनी सांगितल्यानुसार, अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील बरदा गावाजवळ काही लोक रस्त्या किनारी झोपड्या करुन राहतात. येथून ट्रक भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर ट्रक या झोपडपट्टीत घुसला. अपघातावेळी 20-25 लोक झोपलेले होते. या सर्वांना चिरडत ट्रक एका खड्ड्यात कोसळला. जखमींचा आवाज ऐकून जवळच्या गावातील लोक घटनास्थील आले आणि त्यांनी पोलिसांना सूचना दिली.

मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई
या घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. तसेच, त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. 

Web Title: Loaded truck rammed into slums; 25 crushed, 8 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.