‘लायर्स डाइस’ आॅस्करच्या स्पर्धेत
By Admin | Updated: September 24, 2014 05:07 IST2014-09-24T05:07:22+5:302014-09-24T05:07:22+5:30
लायर्स डाइस हा हिंदी चित्रपट २०१५मध्ये भारतातर्फे आॅस्करच्या स्पर्धेत उतरणार आहे

‘लायर्स डाइस’ आॅस्करच्या स्पर्धेत
नवी दिल्ली : लायर्स डाइस हा हिंदी चित्रपट २०१५मध्ये भारतातर्फे आॅस्करच्या स्पर्धेत उतरणार आहे. गीतांजली थापा आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट सर्वोत्कृष्ट परकीय चित्रपटांच्या विभागात दाखल होत आहे. ‘मेरी कोम’सह २९ चित्रपटांच्या स्पर्धेत बाजी मारून लायर्स डाइस आॅस्करवारीला जाणार आहे. भारतीय चित्रपट महामंडळाचे सरचिटणीस सुपर्ण सेन यांनी मंगळवारी ही माहिती दिली.