गळती विषयाला प्राध्यान्य द्यावे पावसाळ्यापूर्वी काम व्हावे : सुशोभिकरणाबरोबरच प्राधान्य मिळावे
By Admin | Updated: April 14, 2016 00:54 IST2016-04-14T00:54:46+5:302016-04-14T00:54:46+5:30
जळगाव : मेहरूण तलावात जास्तीत जास्त पाणी साचावे यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रयत्न झाले. परिणामी हा तलावा शंभर टक्के भरला होता. मात्र व्हॉल्व्ह गळतीमुळे आता तलाव कोरड पडण्याचीच वेळ आली असताना या गंभीर विषयाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते.

गळती विषयाला प्राध्यान्य द्यावे पावसाळ्यापूर्वी काम व्हावे : सुशोभिकरणाबरोबरच प्राधान्य मिळावे
ज गाव : मेहरूण तलावात जास्तीत जास्त पाणी साचावे यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रयत्न झाले. परिणामी हा तलावा शंभर टक्के भरला होता. मात्र व्हॉल्व्ह गळतीमुळे आता तलाव कोरड पडण्याचीच वेळ आली असताना या गंभीर विषयाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते. मेहरूण तलावाच्या बांधाखालून पाईपलाईन टाकून व्हॉल्व्हची सोय करण्यात आलेली आहे. त्या व्हॉल्वला दोन वर्षापासून गळती लागली आहे. त्यावरील पाईपही सडला आहे. त्यामुळे त्यातून पाण्याची बांधाच्या पलिकडे शिवाजी उद्यानाकडील बाजूने गळती सुरू आहे. या ठिकाणाहून प्रचंड पाणी वाहून गेले. त्यामुळेे आता तलाव कोरडा पडण्याची वेळ आली आहे. थातूरमातूर कामगेल्या वर्षी ही गळती थांबविण्याचे काम करण्याचा प्रयत्न झाला. आमदार सुरेश भोळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र त्या कामात यश येऊ शकले नाही. गळती सुरूच राहिली. दुर्लक्षाचे परिणामयाप्रश्नी महापालिकेने याप्रश्नी लघु पाटबंधारे विभागाची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. या विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळावे असा पत्रव्यवहार झाला मात्र त्यासाठीची फी देण्यात आखडता हात घेतला गेल्यामुळे तो विषय तसाच मागे पडला. परिणामी पाणी वाहून गेल्याची परिस्थिती आज उद्भवली आहे. दुरुस्तीची मागणीसुशोभिकरणाचे काम वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाले आहे, हे स्वागतार्ह आहे. मात्र त्याबरोबरच व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम अगोदर हाती घेतले जाणे आवश्यक आहे. या बिघाडामुळे पाणी वाहून गेले हे लक्षात घेतले जावे व दुरुस्ती करावी अशी मागणी मल्हार कम्युनिकेशनचे आनंद मल्हारा यांनी केली आहे. पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात असल्याने हे काम रेंगाळले होते आता पाणी कमी झाल्याने ही दुरुस्ती करणे शक्य होऊ शकते असेही त्यांचे म्हणणे आहे.