शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

LIVE: धुळीचं वादळ दिल्लीत धडकलं; उत्तर भारतात हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 08:32 IST

देशातील 15 राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात उत्तर भारतात आलेल्या वादळानं शंभरहून अधिक जणांचा बळी घेतला होता. आता पुन्हा या वादळाचा फटका देशातील 15 राज्यांना बसण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ दिल्लीत धडकलंय. हरयाणात पोहोचलेल्या वादळाचा वेग ताशी 70 किलोमीटर इतका आहे. हवामान खात्यानं आधीच या वादळाचा अंदाज व्यक्त केला होता. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं 15 राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या अनेक राज्यांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय हरयाणामधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय. उत्तर भारतात गेल्या आठवड्यातही वादळानं हाहाकार माजवला होता. यामध्ये शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यांना वादळाचा धोका आहे. राजस्थानच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरूय. तर गाझियाबादमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. नोएडामधील सर्व शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवाई वाहतुकीवर वादळाचा परिणाम झालाय. हवाई वाहतूक जवळपास 22 मिनिटं उशिरानं सुरुय. दिल्ली विमानतळ परिसरात वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितास इतका असल्यानं विमान सेवेवर परिणाम झालाय.Live Updates: 

- उत्तराखंडमधील देहरादून येथे पाऊस आणि धुळीच्या वादळामुळे वीजेचे खांब कोसळले; वीज पुरवठा खंडित- उत्तरराखंडमधील सर्व अधिकारी पुढील 48 तास हाय अलर्टवर. वारा 70 ते 80 किलोमीटर प्रतितास वेगानं वाहण्याची शक्यता

- ग्रेटर नोएडा-दादरी भागातील वीज पुरवठा खंडित; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्यास सुरुवात- धुळीच्या वादळाचा वाहतुकीवर परिणाम; यमुना एक्स्प्रेस वेवरील वाहतूक संथ गतीनं 

- पुढील 24 ते 36 तास उत्तराखंडमध्ये धुळीचं वादळ घोंगावणार- दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडित

- दिल्ली-एनसीआरमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर- गुरुग्राममध्ये वादळ धडकलं; सायबर सिटीमधील वीज पुरवठा खंडित

 

टॅग्स :Dust stormधुळीचे वादळNew Delhiनवी दिल्लीHaryanaहरयाणाUttar Pradeshउत्तर प्रदेश