शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचारात भाजपा-काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 04:47 IST

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ आठ दिवस उरले आहेत. निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून काँग्रेस व भाजपने एकमेकांवरील हल्ले तीक्ष्ण केले आहेत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ आठ दिवस उरले आहेत. निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून काँग्रेस व भाजपने एकमेकांवरील हल्ले तीक्ष्ण केले आहेत. दिवसेंदिवस दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी होत आहे, व्यक्तिगत आरोपांच्या फैरी झडत आहेत.राज्यात काँग्रेस सरकार टिकवण्यासाठी लढत आहे तर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ सभा घेण्याचे ठरवून सरकार आणि पक्षाची सगळी शक्ती या निवडणुकीसाठी पणाला लावली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने साम, दाम, दंड, भेदाचा मार्ग अवलंबून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य करून हल्ले सुरू केले आहेत.निवडणूक प्रचारात मोदी बंगळुरुला गार्बेज सिटी म्हणत असून त्याचा दोष राज्य सरकारला देत आहेत, सिद्धरामय्या यांनी बंगळुरूला गार्बेज सिटी बनवली, असा आरोप ते करीत आहेत. मोदी यांनी जनरल थिमय्या आणि जनरल करीअप्पा यांचे नाव घेऊन काँग्रेसवर हल्ला केला की, काँग्रेसने या दोघांचा अपमान केला होता. राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्यास मोदी विसरले नाहीत. अर्थात गांधीही मागे न राहता म्हणाले की, गार्डन सिटीला गार्बेज सिटी संबोधून मोदी यांनी बंगळुरूत राहणाऱ्यांचा अपमान केला आहे. बंगळुरू हा भारताचा गौरव असल्याचे राहुल गांधी म्हणाले.भाजपा नेत्यांकडून होत असलेले वैयक्तिक आरोप आणि वापरली जाणारी भाषा यावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर चौफेर हल्ला चढविला आहे. निवडणूक आयोगाकडे भाजपच्या प्रचाराबद्दल तक्रारही नोंदविली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी आरोप केला की, मोदी काँग्रेसवर हल्ला करण्याऐवजी या राज्याचा आणि तेथील जनतेचा अपमान करीत आहेत. पंतप्रधान मोदी खोटारडे आहेत. राज्याचा विकास त्यांना दिसत नाही; त्यांना गुन्हेगारी आणि दुराचारच दिसतो.आयटी हब त्यांना दिसत नाही. जनरल थिम्मया आणि करिअप्पा यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरून पंतप्रधानांचा इतिहास किती दुबळा आहे, हे दिसून येते. भाजप आणि मोदी राज्यांत मतविभाजन करून सांप्रदायिकता निर्माण करू पाहत आहेत.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस