१० वर्षात देशातील साक्षरतेचे प्रमाण फक्त १० टक्क्यांनी वाढले
By Admin | Updated: November 23, 2014 11:42 IST2014-11-23T09:51:06+5:302014-11-23T11:42:34+5:30
शिक्षणाच्या प्रसारासाठी भारतात अथक प्रयत्न होत असले तरी हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे समोर आले आहे.

१० वर्षात देशातील साक्षरतेचे प्रमाण फक्त १० टक्क्यांनी वाढले
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - शिक्षणाच्या प्रसारासाठी भारतात अथक प्रयत्न होत असले तरी हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे समोर आले आहे. गेल्या १० वर्षात देशातील साक्षरतेचे प्रमाण फक्त १० टक्क्यांनीच वाढल्याची माहिती उघड झाली असून आजही देशातील १० पैकी एका कुटुंबातील एकही व्यक्ती साक्षर नाही.
शुक्रवारी देशातील शिक्षणाच्या सद्यस्थितीसंदर्भात एक अहवाल प्रकाशित झाला आहे. भारतातील २४.८८ कोटी घरं असून त्यापैकी ९.५६ कोटी (३८.४२ टक्के ) घरांमधील किमान ४ सदस्यांना लिहीता आणि वाचता येते. मात्र २.४२ कोटी (९.७४) घरांमधील एकही व्यक्ती साक्षर नसल्याची निराशाजनक वास्तव या अहवालातून समोर येते. २००१ मध्ये देशातील साक्षरतेचे प्रमाण ६४.८४ टक्के होते. तेच प्रमाण २०११ मध्ये ७४ टक्के ऐवढे झाले आहे. ग्रमीण भागात साक्षरतेचे प्रमाण ६८ टक्के तर शहरी भागात ८४ टक्के ऐवढे आहे.