अक्षयच्या सिनेमाचं नाव ऐकून मोदींना आले हसू

By Admin | Updated: May 9, 2017 21:31 IST2017-05-09T21:31:38+5:302017-05-09T21:31:38+5:30

टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षयने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी अक्षयच्या या चित्रपटाचे नाव ऐकून मोदींना

Listening to Akshay's name, he came to Modi | अक्षयच्या सिनेमाचं नाव ऐकून मोदींना आले हसू

अक्षयच्या सिनेमाचं नाव ऐकून मोदींना आले हसू

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार ""टॉयलेट एक प्रेमकथा" हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षयने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी अक्षयच्या या चित्रपटाचे नाव ऐकून मोदींना हसू आवरता आले नाही. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी अशा स्वच्छ भारत अभियानावर टॉयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटात अक्षयबरोबर भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून अक्षय प्रेक्षकांना स्वच्छतेचे धडे देताना दिसणार आहे. त्यानिमित्तानेच अक्षयने आज मोदींची भेट घेतली होती. यावेळी अक्षयने आपल्या चित्रपटाची माहिती मोदींना दिली.    या भेटीची छायाचित्रे अक्षयने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या चित्रपटाचे नाव ऐकून जे हास्य फुलले ते पाहून माझा पूर्ण दिवस आनंदात गेला,  असे अक्षयने लिहिले आहे. 
 टॉयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केला असून, त्यात स्वच्छतेवर भाष्य करण्यात आले आहे. तसेच अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर विनोदी पद्धतीने शेरेबाजी करण्यात आली आहे. हा चित्रपट यावर्षी 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.  

Web Title: Listening to Akshay's name, he came to Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.