माझं म्हणणं पण ऐका - सलमान खानचं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट
By Admin | Updated: January 28, 2016 15:06 IST2016-01-28T15:06:28+5:302016-01-28T15:06:28+5:30
मुंबईमधल्या हिट अँड रन प्रकरणात माझं काय म्हणणं आहे, ते पण ऐका आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर त्याआधी निर्णय देऊ नका अशी कॅव्हिएट सलमान खानच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे

माझं म्हणणं पण ऐका - सलमान खानचं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - मुंबईमधल्या हिट अँड रन प्रकरणात माझं काय म्हणणं आहे, ते पण ऐका आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर त्याआधी निर्णय देऊ नका अशी कॅव्हिएट सलमान खानच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
सलमान खानची मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याआधारे या २२०२ मधल्या प्रकरणाच्या अत्यंत गाजलेल्या खटल्यातून सुटका केली होती. त्याआधी सत्र न्यायालयाने सलमानला मद्याच्या नशेत फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांवर गाडी घातल्याबद्दल दोषी ठरवत त्याला पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सलमानने सुस्कारा टाकला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या याचिकेसंदर्भात बुधवारी सलमानच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केली आहे.