शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Kashmir Terror Attack: भारतीय जवानांवर याआधी कधी झाले होते मोठे हल्ले; जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 18:25 IST

जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे. यावेळी दहशतवाद्यांनी बसमधून जाणाऱ्या सुरक्षा जवानांना लक्ष्य केलं आहे. पुलवामातल्या अवंतीपुरातल्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले असून, सीआरपीएफचे 35हून अधिक जवान जखमी आहेत. जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेले हा हल्ला काही पहिला नाही. यापूर्वीही दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलं आहे. जाणून घ्या कधी कधी झाले जवानांवर दहशतवादी हल्ले

2016मध्ये उरीतल्या लष्करी तळावर दहशतवादी भीषण हल्ला केला होता. हा हल्ला जम्मू-काश्मीरमधल्या उरी सेक्टरजवळच्या एलओसीजवळच्या भारतीय लष्कराच्या स्थानिक मुख्यालयावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 18 जवान शहीद झाले आहेत. जवानांच्या कारवाईत चार दहशतवादी ठार झाले होते. हा भारतीय लष्करावर 20 वर्षांनंतर करण्यात आलेला सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी रात्रीच्या वेळी हातात शस्त्र नसलेल्या रात्रीच्या वेळी झोपेत असलेल्या जवानांवर हल्ला केला होता. याचा बदला घेण्यासाठी भारतानं सर्जिकल स्ट्राइकही केले होते. 

  • 29 नोव्हेंबर 2016- जम्मू-काश्मीरमधल्या नगरोटामध्ये लष्करी कॅम्पवर हल्ला

29 नोव्हेंबर 2016ला जम्मू-काश्मीरमधल्या नगरोटा इथल्या लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर लष्कराचे 7 जवान शहीद झाले होते. या हल्लात दहशतवादी पोलिसांच्या वेशात आले होते. 

  • 27 एप्रिल 2017- कुपवाड्यातील पंजगाममध्ये सेनेच्या लष्करी कॅम्पवर हल्ला

27 एप्रिल 2017ला कुपवाड्यातील पंजगाम येथे लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं होतं. तर तीन भारतीय जवान शहीद झाले होते. 

  • 5 जून 2017 – बांदीपोऱ्यातील संबलमध्ये CRPFच्या कॅम्पवर हल्ला

5 जून 2017 ला बांदीपोऱ्यातील संबळमधील सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात लष्करानं चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

  • 26 ऑगस्ट 2017- पुलवामा पोलीस लाइनमध्ये दहशतवादी हल्ला

26 ऑगस्ट 2017ला पुलवाम्यातील पोलीस लाइनमध्येही दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते. तर 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं होतं. 10-11 फेब्रुवारी 2018लाही सुंजवा इथल्या लष्कराच्या तळावर हल्ला झाला होता, ज्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर 6 जवान शहीद झाले होते. 

  • 2019मध्ये आतापर्यंत 28 दहशतवादी मारले गेले

2019ला 28 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. तर 2014मध्ये 866 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 2018मध्ये जवळपास 614 दहशतवादी घटना घडल्या. 2018मध्ये 91 सुरक्षा जवान शहीद झाले. 2018मध्ये 257 दहशतवादी मारले गेले. 2017मध्ये 213 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं. तर लष्कराचे 80 जवान शहीद झाले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी