शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

लसीकरण प्रमाणपत्र दाखवा अन् खरेदी करा दारू, इटावा शहरातील दुकानांवर लागले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 20:51 IST

vaccine certificate : लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मद्यविक्री करू नये, अशा कडक सूचना एसडीएमने दुकानदारांना दिल्या आहेत.

ठळक मुद्दे'लसीकरणासाठी प्रेरित करणे चांगली गोष्ट आहे, परंतु दारू विक्रीसाठी अनिवार्य नाही'

इटावा : उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यात दारूच्या दुकानांची तपासणी केली जात आहे. अलिगडमध्ये विषारी दारूच्या घटनेनंतर राज्यात प्रशासन आणि पोलीस पूर्णपणे सक्रीय झाले आहे. ठिकठिकाणी दारूचे ठेके व दारू दुकानांची तपासणी केली जात आहे. (liquor will not be available in etawah district of up without vaccine certificate)

याच अनुषंगाने सैफई येथे तैनात एसडीएम हेम कुमार सिंग यांनी त्यांच्या परिसरात पोलीस दलासह दारूचे ठेके, दारूची दुकाने तपासली. तसेच, या दारू दुकानांवर पोस्टर लावण्यात आले. पोस्टरवर असे लिहिले आहे की, ज्यावेळी लोक कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवतील, त्यावेळीच दारू विकली जाईल. पहिल्यांदा लस घ्या, नंतर दारू खरेदी करायला या.

लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मद्यविक्री करू नये, अशा कडक सूचना एसडीएमने दुकानदारांना दिल्या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे देशात लसीकरणानंतर केवळ तीन टक्के लसीकरण झाल्यानंतर लसीकरणाचे टार्गेट वाढविण्यासाठी आता अधिकारी वेगवेगळे डावपेच अवलंबत आहेत. दरम्यान, दारूची दुकाने महसूल वाढविण्यात ज्या प्रकारे सहकार्य करतात, त्याच प्रकारे राज्यात लसीकरण वाढविण्यासाठी दारूच्या दुकानांचा देखील सहारा घेतला जात आहे.

एसडीएम साहेब आले होते. पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तसेच, लसीकरण प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय दारूची विक्री करू नये, असे सांगितले आहे.  आता आम्ही बहुतेक लोकांना लस घेण्यास सांगत आहोत. बरेच लोक लसीकरणाचे प्रमाणपत्र न घेता आले, आम्ही त्यांना दारू न विकता परतून पाठवून देत आहोत, असे एका दुकानदारांने सांगितले.

उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, दारू दुकानांसाठी ग्राहकांना लसीकरण करण्याचे अधिकृत आदेश नाही. परंतु जर सैफईचे एसडीएम हे करत असतील तर ते त्यांच्या स्वत: च्या निर्णयावरुन करत आहेत. लसीकरणासाठी प्रेरित करणे चांगली गोष्ट आहे, परंतु दारू विक्रीसाठी अनिवार्य नाही.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या