एसटी बसमधून दारू जप्त

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:49+5:302015-08-08T00:23:49+5:30

- देवगड आगाराच्या चालक-वाहकास अटक

The liquor seized on ST buses | एसटी बसमधून दारू जप्त

एसटी बसमधून दारू जप्त

-
ेवगड आगाराच्या चालक-वाहकास अटक
कणकवली : एसटी बसमधून शुक्रवारी १३ हजार ६५० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी देवगड आगाराच्या चालक-वाहकास अटक करण्यात आली. दोघांची प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामिनावर मुक्तता करण्यात आली.
पणजी-देवगड ही बस पोलिसांनी सकाळी १०.३० वाजता वागदे-डंगळवाडी येथे अडविली. यावेळी बस तपासण्यात आली असता बॅटरी बॉक्समध्ये दारूच्या बाटल्यांनी भरलेले पोते ठेवण्यात आले होते. तसेच गाडीच्या स्टेअरिंगखाली आणि वाहकाच्या आसनावरील रॅकमध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळल्या. (प्रतिनिधी)

Web Title: The liquor seized on ST buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.