एसटी बसमधून दारू जप्त
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:48+5:302015-08-08T00:23:48+5:30
- देवगड आगाराच्या चालक-वाहकास अटक

एसटी बसमधून दारू जप्त
- ेवगड आगाराच्या चालक-वाहकास अटककणकवली : एसटी बसमधून शुक्रवारी १३ हजार ६५० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी देवगड आगाराच्या चालक-वाहकास अटक करण्यात आली. दोघांची प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामिनावर मुक्तता करण्यात आली. पणजी-देवगड ही बस पोलिसांनी सकाळी १०.३० वाजता वागदे-डंगळवाडी येथे अडविली. यावेळी बस तपासण्यात आली असता बॅटरी बॉक्समध्ये दारूच्या बाटल्यांनी भरलेले पोते ठेवण्यात आले होते. तसेच गाडीच्या स्टेअरिंगखाली आणि वाहकाच्या आसनावरील रॅकमध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळल्या. (प्रतिनिधी)