शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Liquor Scam: अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री? वाचा AAP नेते संजय सिंह काय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 12:14 IST

Arvind Kejriwal wife Sunita Kejriwal, Delhi Liquor Scam: दारू घोटाळा प्रकरणी सध्या अरविंद केजरीवाल तुरूंगात आहेत.

Arvind Kejriwal wife Sunita Kejriwal, Delhi CM, Liquor Scam Case: दारू घोटाळा प्रकरणात सध्या दिल्लीचेमुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल हे तुरूगवासात आहेत. पण याच घोटाळ्याशी संबंध असलेले संजय सिंह मात्र तुरुंगातून बाहेर आले आहेत. तुरूंगाबाहेर येताच त्यांनी टीओआयशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल निर्दोष असल्याचा दावा केला. मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक विधाने केली. तिहार जेलमधून जामिनावर बाहेर असलेले संजय सिंह यांनी भाजपावर सडकून टीका केली. संजय सिंह यांच्या म्हणण्यानुसार, या घोटाळ्याचे काही साक्षीदार भाजपाशी संबंधित असून त्यांच्या साक्षीच्या आधारे केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. केजरीवाल यांचा जामीन मिळत नसल्याने आता ते मुख्यमंत्रीपद सोडणार का, त्यांच्या जागी पत्नी सुनीता केजरीवाल या दिल्लीच्या CM बनणार का, अशा काही प्रश्नांची संजय सिंह यांनी उत्तरे दिली.

सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री होणार का?

केजरीवाल यांच्या जागी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल दिसणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, संजय सिंह म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि यापुढेही तेच राहतील. आम्ही एक सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, दिल्लीच्या जनतेला अरविंद केजरीवाल यांनीच दिल्लीचे मुख्यमंत्री राहावे असे वाटते. सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना तुरुंगात संगणक आणि इंटरनेट सुविधा देण्यात आल्या, जेणेकरून ते त्यांचे कार्यालय चालवू शकतील. जोपर्यंत अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळत नाही, तोपर्यंत त्यांनाही सरकार चालवण्यासाठी अशाच सुविधा मिळाव्यात. आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही. सारं काही आहे तसंच राहिल.

'आप'चे नेतृत्व बदलणार?

आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात बदल होणार का? यावर प्रतिक्रिया देताना संजय सिंह म्हणाले की, मला आशा आहे की अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनाही लवकरच जामीन मिळेल आणि तुरूंगातून बाहेर येतील. सर्वोच्च न्यायालयाने PMLAच्या कलम ५० अंतर्गत नोंदवलेल्या साक्षीदारांचे जबाब तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यातून तथ्य आणि सत्य बाहेर येईलच.

तुरुंगातून सरकार कसे चालवणार?

अरविंद केजरीवाल यांना तुरूंगात संगणक द्यावा जेणेकरून ते काम करू शकतील अशी आपची मागणी आहे. पण दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना म्हणतात की, तुरुंगातून सरकार चालवू देणार नाही. अशा स्थितीत दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार का? यावर उत्तर देताना संजय सिंह म्हणाले की, संविधानाचे निर्माते डॉ. आंबेडकर आहेत, नायब राज्यपाल नाहीत. मुख्यमंत्र्यांना तुरुंगातून सरकार चालवण्यापासून संविधान रोखत नाही. त्यामुळे तसे काहीही घडणार नाही.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीChief Ministerमुख्यमंत्रीAAPआप