100 रुपयांच्या दारूसाठी 'त्याला' 10 हजारांचा भुर्दंड

By Admin | Updated: January 12, 2017 16:40 IST2017-01-12T16:40:44+5:302017-01-12T16:40:44+5:30

गुजरातमधल्या बोपाल येथे एका व्यक्तीला 100 रुपयांची 180 मिली दारू बाळगल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

For a liquor of Rs 100, he has a '10,000' | 100 रुपयांच्या दारूसाठी 'त्याला' 10 हजारांचा भुर्दंड

100 रुपयांच्या दारूसाठी 'त्याला' 10 हजारांचा भुर्दंड

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. 12 - गुजरातमधल्या बोपाल येथे एका व्यक्तीला 100 रुपयांची 180 मिली दारू बाळगल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीला 100 रुपयांच्या दारूसाठी तब्बल 10 हजारांचा दंड भरावा लागला आहे. 10 हजारांचा दंड भरल्यानंतरच त्याला जामीन मंजूर झाला आहे.

रणजित वाघेला असं या व्यक्तीचं नाव असून, त्यानं जामिनासाठी दुस-यांदा प्रयत्न केला. तत्पूर्वी न्यायदंडाधिका-यांनी त्याचा जामीनअर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-यानं दिली आहे.

गुजरातमध्ये कायद्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्यानं गुजरात सरकारनं कायद्यात अनेक सुधारणा केल्या आहेत.

Web Title: For a liquor of Rs 100, he has a '10,000'