मध्य प्रदेशात होणार टप्प्याटप्प्याने दारूबंदी
By Admin | Updated: April 11, 2017 00:50 IST2017-04-11T00:50:47+5:302017-04-11T00:50:47+5:30
राज्यातील सर्व दारूची दुकाने टप्प्याटप्प्याने बंद करून अंतिमत: संपूर्ण दारूबंदी लागू करण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे.

मध्य प्रदेशात होणार टप्प्याटप्प्याने दारूबंदी
भोपाळ: राज्यातील सर्व दारूची दुकाने टप्प्याटप्प्याने बंद करून अंतिमत: संपूर्ण दारूबंदी लागू करण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. नरसिंगपूर जिल्ह्यात नीमखेडा गावात ‘नर्मदा बचाव यात्रे’च्या कार्यक्रमात ही घोषणा करताना चौहान यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात नर्मदा नदीपात्राच्या दुतर्फा पाच किमीच्या पट्ट्यातील दारूची सर्व दुकाने बंद केली जातील. नंतर निवासी वस्त्या, शैक्षणिक संस्था व धार्मिक स्थळांच्या परिसरात कोणत्याही नव्या दारू दुकांना परवाने दिले जाणार नाहीत.