शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाती आधार कार्ड सोबत लिंक करण्यामागे केंद्र सरकारचा हा आहे मोठा हेतू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 17:22 IST

देशातील  नागरिकांची बँक खाती आधार कार्डसोबत लिंक करवून घेण्यासाठी सरकारी स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यामागे सरकारचा मोठा हेतू लपलेला आहे.

नवी दिल्ली - देशातील  नागरिकांची बँक खाती आधार कार्डसोबत लिंक करवून घेण्यासाठी सरकारी स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे 75 कोटी बँक खाती आधार कार्डसोबत लिंक झाली आहेत. तसेच 48 कोटी खाती आणि आधार कार्डमधील माहिती यांचे प्रमाणीकरण झाले आहे. आता उर्वरित बँक खात्यांना आधार कार्डसोबत जोडण्याच्या कामाला वेग देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ज्यामुळे गरीबांपर्यंत अधिकाधिक मदत पोहोचवण्याचे कार्यक्रम आखता येईल. तसेच आधार कार्डसोबत लिंक करण्यात आलेल्या बँक खात्यांचा आकडा 100 कोटींच्या वर नेण्याचे उद्दीष्ट सरकारने समोर ठेवले आहे.  आधार कार्डशी लिंक करण्यात आलेल्या खात्यांचा वापर व्यापक सामाजिक सुरक्षा अर्थात युनिव्हर्सल बेसिक स्कीम (यूबीआय) पेमेंटसाठी करण्यात येऊ शकतो. या बाबत सरकारच्या धोरणाबाबत माहिती असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, " जर युनिव्हर्सल बेसिक स्कीम लागू करण्याचा निर्णय झाला तर ही बँक खाती त्याचा कणा बनू शकतील." केंद्र सरकारने यावर्षी बँक खात्यांना आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते. तसेच जी खाती आधार कार्डशी लिंक होणार नाहीत त्यांची खाती गोठवण्यात येतील. रिझर्व्ह बँकेनेसुद्धा गेल्या आठवड्यात या बाबीचा पुनरुच्चार केला होता.  दरम्यान, विविध सरकारी योजनांचे लाभ व अनुदान मिळविण्यासाठी लाभार्थींनी ‘आधार कार्ड’ काढून त्याची जोडणी करून घेण्यासाठीची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले होते.‘आधारसक्ती’च्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणारी प्रलंबित याचिका सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे आली, तेव्हा अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आधी ही मुदत डिसेंबरअखेर संपणार होती, परंतु ती पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत वाढविण्याची सरकारची तयारी आहे.मात्र, ज्यांनी अद्याप ‘आधार’ क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही व ज्यांची तसे करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ लागू असेल, असे ते म्हणाले. म्हणजेच या वाढीव मुदतीनंतरही ज्यांच्याकडे ‘आधार’ नसेल, त्यांना सरकारी योजनांचे लाभ बंद करणार का, याचा खुलासा त्यांनी केला नाही.मोबाइल-आधार जोडणी सुलभ करण्याचे निर्देशग्राहकांना त्यांच्या मोबाइल क्रमांकाची ‘आधार’शी जोडणी करून घेणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सरकारने टेलिकॉम कंपन्यांना अनेक निर्देश दिले असल्याचे दूरसंचार खात्यातील माहितगार सूत्रांनी सांगितले. ही जोडणी करताना ग्राहकाच्या ‘आधार’ माहितीची गोपनियता भंग होऊ नये यासाठी काय करावे, हेही कंपन्यांना सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डIndiaभारतGovernmentसरकारbankबँक