अंनिसच्या बातमीला जोड
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:52+5:302015-08-20T22:09:52+5:30

अंनिसच्या बातमीला जोड
>चौकटगेल्या २० वर्षात गृहखात्याचे अस्तित्त्वच नाहीपोलिसांमध्ये डॉक्टर दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या खुनाचा शोध लावण्याची इच्छाच दिसून येत नाही. खुन्यांना सरकारमध्ये सामील असणार्यांचा पाठिंबा आहे की काय अशी शंका येत आहे. राज्यात गेल्या १५ ते २० वर्षात गृहखाते अस्तित्त्वाच नाही अशी परिस्थिती आहे अशी जोरदार टिका काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केली. लोकशाहीला मजबूत करणार्या संस्थांना निकामी करण्याचे कारस्थान शासनाकडून केले जात आहे. नियोजन आयोग, एफटीआय, बँकांचे जाणीवपूर्व खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप दलवाई यांनी केला...............चौकटराग, संताप कृतीशील कामातून व्यक्त करूदोन वर्षे उलटली तरी दाभोलकरांच्या खूनाचा छडा लागलेला नाही. सरकारमधील लोकांमध्ये अनास्थेची भावना दिसून येत आहे, यापार्श्वभुमीवर तुम्हांला राग येत नाही का अशी विचारणा आम्हांला होत आहे. मात्र आमचा राग, संताप आम्ही कृतीशील कामांमध्ये ओतून त्यातून व्यक्त करू असा विश्वास अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केला...............