गडहिंग्लजमध्ये लिंगायत वधू-वर मेळावा उत्साहात

By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:08+5:302017-01-31T02:06:08+5:30

Lingayat bride-groom meet in Gadhinglj | गडहिंग्लजमध्ये लिंगायत वधू-वर मेळावा उत्साहात

गडहिंग्लजमध्ये लिंगायत वधू-वर मेळावा उत्साहात

>गडहिंग्लज : येथील जडेयसिद्धेश्वर बेलबागेत वीरशैव समाजसेवा मंडळ व गणेश वधू-वर सूचक केंद्र इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगायत वधू-वर सूचक मेळावा उत्साहात पार पडला. नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले.
वीरशैव समाज मंडळाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी यांनी स्वागत केेले. मेळाव्यात गडहिंग्लज, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, धारवाड जिल्‘ांतील ८२ वधू-वरांनी भाग घेऊन एकमेकांचा परिचय करून घेतला. नगराध्यक्षा कोरी व राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवगोंडअण्णा पाटील, संजय माने, गजेंद्र बंदी, बाळ पाटील, काशीनाथ घुगरी, महादेव मुसळे, अरविंद कित्तूरकर, जवाहर घुगरी, दयानंद खन्ना, आदींसह समाजबांधव उपस्थित होते. विजय बेनाडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Lingayat bride-groom meet in Gadhinglj