विवाह समारंभातून ११ लाखांचे दागिने लंपास
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:18+5:302015-03-06T23:07:18+5:30
पंचवटी : विवाह समारंभासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अकरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी पंचवटी परिसरात घडली़

विवाह समारंभातून ११ लाखांचे दागिने लंपास
प चवटी : विवाह समारंभासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अकरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी पंचवटी परिसरात घडली़याबाबत अधिक माहिती अशी की, सुनंदा अशोक पवार (५०, रा़ पार्थ निवास, मालेगाव कॅम्प, मालेगाव़) या त्यांच्या नात्यातील विवाह समारंभासाठी बुधवारी (दि़४) हनुमानवाडीतील राका लॉन्समध्ये आलेल्या होत्या़ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सोफासेटवर बसलेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्याजवळ ठेवलेली पर्स चोरून नेली़ त्यामध्ये रोख दीड लाख रुपये, २६ तोळे सोन्याचे ९ लाख ११ हजार रुपयांचे दागिने, १५ हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू, मोबाइल फोन असा एकूण दहा लाख ७९ हजार रुपयांचा ऐवज होता़ या प्रकरणी सुनंदा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)