युपी को बाप पसंद है - परेश रावलनी केला मोदींचा जयजयकार
By Admin | Updated: March 11, 2017 13:43 IST2017-03-11T13:36:54+5:302017-03-11T13:43:10+5:30
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ३०० हून जागा मिळवणा-या भाजपाचे खासदार परेश रावल यांनी अभिनंदन केले.

युपी को बाप पसंद है - परेश रावलनी केला मोदींचा जयजयकार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ३०० हून अधिक जागा मिळवत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाला अभिनेता आणि भाजपा खासदार परेश रावल यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. ' यु.पी.को बाप (मोदी) पसंद है' असं ट्विट त्यांनी केले आहे. याशिवाय त्यांनी समाजवादी पार्टीवर निशाणा साधण्याची संधीही सोडलेली नाही. 'लॅपटॉप वाटणा-यांचा नव्हे तर वीज पुरवठा देणा-यांचाच विजय होतो, हेही सिद्ध झाले' असे सांगत त्यांनी अखिलेश सरकारला टोमणा मारला आहे. पंजाब आणि गोव्यात ' आम आदमी पक्षा'च्या झालेल्या दारूण पराभवावरही त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.
यु पी को बाप ( मोदी ) पसंद है !
— Paresh Rawal (@SirPareshRawal) March 11, 2017
येह साबित हो गया के जीत लेपटोप (सपा) बाँटने वालों की नहीं पर बिजली देने वालों (मोदीजी)की होती है ...
— Paresh Rawal (@SirPareshRawal) March 11, 2017
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही ट्विट करून एका प्रकारे 'हर हर मोदी'चा नारा दिला आहे. भारतीय लोकशाहीचा एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. आता पुढच्या लोकसभा निवडणुकीत कोणाचा विजय होणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही' असं ट्विट करत त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारचे कौतुक केले आहे.