जरीपटक्यात बॅग लिफ्टींग
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:04+5:302015-01-29T23:17:04+5:30
रोख आणि मोबाईल लंपास

जरीपटक्यात बॅग लिफ्टींग
र ख आणि मोबाईल लंपासनागपूर : पायी जात असलेल्या महिलेच्या हातातील पर्स दुचाकीस्वार लुटारूंनी हिसकावून नेली. आज दुपारी १२.४५ वाजता वर्दळीच्या कपिलनगरात ही घटना घडली. जसविंदर कौर गुरुविंदरसिंग बाजवा (वय ३२, रा. मैत्री कॉलनी, कपिल नगर) या आज दुपारी त्यांच्या जाऊसोबत घरून टेका नाका येथे जात होत्या. दुचाकीवर आलेल्या दोनपैकी मागे बसलेल्या लुटारूने भारत गॅस गोडावून जवळ जसविंदर यांच्या हातातील पर्स हिसकावून घेतली. पर्समध्ये रोख ५० हजार तसेच नोकियाचा मोबाईल होता. जसविंदर यांनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली. मात्र, त्यांना घटना कळेपर्यंत आरोपी नजरेआड झाले होते. जसविंदर यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. ---