मंगळावर मानवाचे आयुष्य 68 दिवस

By Admin | Updated: October 30, 2014 00:29 IST2014-10-30T00:29:58+5:302014-10-30T00:29:58+5:30

मंगळावर पहिली मानवी वसाहत उभारण्यासाठी जोरदार जाहिरातबाजी चालू असताना, या मोहिमेतील धोका शास्त्रज्ञांनी पुढे आणला

Life on Mars is 68 days | मंगळावर मानवाचे आयुष्य 68 दिवस

मंगळावर मानवाचे आयुष्य 68 दिवस

वॉशिंग्टन : मंगळावर पहिली मानवी वसाहत उभारण्यासाठी जोरदार जाहिरातबाजी चालू असताना, या मोहिमेतील धोका शास्त्रज्ञांनी पुढे आणला असून, मंगळावर जाणा:या लोकांना त्यांच्याजवळ असणा:या लेटय़ुसमुळे (हरितक) विषबाधा  होऊ शकते  असे म्हटले आहे. तसेच मंगळावर गेल्यापासून माणूस फक्त 68 दिवस जगू शकेल, असा इशाराही दिला आहे. 
मंगळावर वन टाईम प्रवास करण्यासाठी मार्स वन ही संस्था आकर्षक योजना जाहीर करत आहे. मंगळावर एका बाजूचा प्रवास म्हणजे तिथे कायम राहावे लागणार हे स्पष्ट आहे. शास्त्रज्ञांच्या मते सात महिने प्रवास करून लोक मंगळावर जातील, पण तिथे गेल्यानंतर 68 दिवसांत ते मृत्युमुखी पडतील.
मार्स वन या मोहिमेची जोरदार तयारी करत असून, चार माणसांची पहिल बॅच 2क्24 र्पयत मंगळावर पोहोचेल असे नियोजन आहे. त्यानंतर दर दोन वर्षानी चार जणांना मंगळावर पाठविण्याची योजना आहे; पण मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील सिडनी डो व त्यांच्या सहका:यांनी कॅनडातील टोरंटो येथील आंतरराष्ट्रीय अंतराळविषयक परिषदेत वेगळी माहिती दिली. त्यांच्या मते मार्स वन संस्थेने मंगळावरील निवास, तेथील वातावरण यासंदर्भात गृहीत धरलेल्या अनेक गोष्टी पडताळणीत चुकीच्या ठरतात. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Life on Mars is 68 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.