आरोपीची जन्मठेप कायम
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:13+5:302015-08-18T21:37:13+5:30
हायकोर्ट : कुऱ्हाडीने वार करून हत्या

आरोपीची जन्मठेप कायम
ह यकोर्ट : कुऱ्हाडीने वार करून हत्यानागपूर : कुऱ्हाडीने वार करून एकाला ठार मारणाऱ्या आरोपीची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.रामलाल शंकर कुमरे (३१) असे आरोपीचे नाव असून तो चार भट्टी, ता. कुरखेडा येथील रहिवासी आहे. २४ मे २००७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.वड्डे मडावी असे मृताचे नाव होते. घटनेच्या दिवसी मडावी गुरांना चरायला घेऊन गेला होता. दरम्यान वाद झाल्यामुळे आरोपीने मडावीला कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारले. कुऱ्हाडीचे घाव पाहता आरोपीचा मडावीला ठार मारण्याचाच उद्देश होता हे सिद्ध होते असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे. कुराडी पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता. आरोपीतर्फे ॲड. डी. एन. कुकडे तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.