शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारताला सियाचिन जिंकून देणारे लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 19:57 IST

सियाचिन ग्लेशियरवर कब्जा करण्यासाठीच्या ऑपरेशन मेघदूतचे हून यांनी केले होते नेतृत्व

नवी दिल्ली -  जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असलेल्या सीयाचिनमध्ये पाकिस्तानला धूळ चारून तिरंगा फडकवण्यात मोलाची भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून यांचे आज निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. पंचकुला येथील एका रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सियाचिन ग्लेशियर ताब्यात घेण्यासाठी 1984 मध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मेघदूतचे नेतृत्व  लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून यांनी केले होते. 1980 च्या सुमारास पाकिस्तानने रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या सियाचिनच्या दिशेने आपल्या सैनिकांना रवाना करण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानने सियाचिनमधील शिखर ताब्यात घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने 1984 मध्ये ऑपरेशन मेघदूत सुरू केले होते. अखेरीस भारतीय जवानांनी प्राण तळहातावर घेत सियाचिनवर कब्जा केला आणि पाकिस्तानचे मनसुबे धुळीस मिळवले. ऑपरेशन मेघदुतबरोबरचे अनेक लष्करी मोहिमांमध्ये जनरल हून यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून यांचा जन्म पास्तानमधील एबटाबाद येथे  झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय भारतात आले होते. लष्कारील विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर 1984 मध्ये त्यांनी ऑपरेशन मेघदूत यशस्वी केले होते. अखेरीस 1987 मध्ये पश्चिम कमांडचे प्रमुख असताना ते लष्करातून निवृत्त झाले होते. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी 2013 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत