इंडिगो वैमानिकाकडे मागितले लायसन्स
By Admin | Updated: September 18, 2016 04:08 IST2016-09-18T04:08:53+5:302016-09-18T04:08:53+5:30
इंडिगो विमानाच्या वैमानिकांकडे राहुल यांच्या सुरक्षा रक्षकांनी उड्डाणाआधी परवाना दाखवण्याची मागणी केल्याने त्यांना धक्काच बसला.

इंडिगो वैमानिकाकडे मागितले लायसन्स
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांना दिल्लीहून वाराणसीला घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या वैमानिकांकडे राहुल यांच्या सुरक्षा रक्षकांनी उड्डाणाआधी परवाना दाखवण्याची मागणी केल्याने त्यांना धक्काच बसला.
अर्थात व्हीआयपींना नेणाऱ्या विमानांचे वैमानिक अनुभवी असावे लागतात. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी परवाना पाहण्यास मागितला असावा, असे सांगण्यात येते. सुरक्षा रक्षकांची मागणी ऐकून वैमानिकांना धक्काच बसला. मिळालेल्या माहितीनुसार विमानाच्या इंधन दर्जाचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. ही घटना १४ सप्टेंबरची आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>इंधनाची तपासणी झाल्यानंतर त्या विमानाने उड्डाण केले. इंडिगो एअरलाइन्सने या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.