शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

तामिळनाडूतील मंदिरे शासन नियंत्रणातून मुक्त करा; सद्‌गुरूंचे १०० ट्वीट्स‌मधून आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 05:40 IST

ईस्ट इंडिया कंपनीने दिलेल्या दुर्दैवी वारशामुळे, तामिळनाडूमधील हिंदू मंदिरे अजूनही सरकारच्या अखत्यारीत आहेत

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मंदिरांना शासकीय नियंत्रणातून सोडविण्याची हाक देत, राज्यातील मंदिरांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सद्‌गुरूंनी १०० ट्वीट्‌सची मोहीम सुरू केली आहे.राज्यातील राजकीय पक्ष आणि नेतृत्व यांना कडक निवेदन करताना सद्‌गुरू आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “फ्री टीएन टेम्पल्स’’ ही अतीव यातनेतून जन्मलेली चळवळ आहे. आज मी कुणालाही दबाव टाकण्यासाठी नव्हे, तर अगदी तीव्र वेदनांनी १०० ट्वीट करीत आहे. समाजाच्या या यातनेचा आवाज ऐकलाच गेला पाहिजे.  

ईस्ट इंडिया कंपनीने दिलेल्या दुर्दैवी वारशामुळे, तामिळनाडूमधील हिंदू मंदिरे अजूनही सरकारच्या अखत्यारीत आहेत. यामुळे वैभवशाली तामिळ परंपरेचा ऱ्हास झाला आणि तिचा गळा घोटला गेला. एचआर अँड सीई (हिंदू धार्मिक व धर्मादाय एंडोव्हमेंट्स विभाग), ज्यांच्या अखत्यारीत राज्यातील ४४,२२१ मंदिरे आहेत. १,१२,९९९ मंदिरांना दररोज पूजेसाठी कोणताही महसूल नाही, असे मद्रास उच्च न्यायालयात सांगण्यात आले.

आपल्या हृदयद्रावक ट्वीट्‌समध्ये संपूर्ण तामिळनाडूमधील भक्तांनी पाठविलेले फोटो आणि व्हिडिओ त्यांनी शेअर केले असून, तामिळ संस्कृतीच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्याकडे केलेल्या दुर्लक्षातून झालेली दुरवस्था त्यातून दिसते.

दयनीय अवस्थेमुळे मनाला वेदना ट्वीटसमवेत असलेल्या व्हिडिओमध्ये सद्‌गुरू म्हणतात, “ही महान कला, तामिळ संस्कृतीचा आत्मा, तामिळ लोकांचे हृदय, या ठिकाणचे पालनपोषण करणाऱ्या भक्तीच्या मूळ स्रोताची अशी अवस्था पाहून हृदय पिळवटून निघते. ही भाषा, आपल्या कला आणि हस्तकला सर्वकाही जपली गेली ती भक्तीमुळे. तामिळ असणारी प्रत्येक गोष्ट भक्तीमध्ये रुजलेली आहे आणि या भक्तीचा पाया ही मंदिरे आहेत. आज त्यांना अशा दयनीय अवस्थेत पाहून मनाला अतिशय वेदना होतात. आता या मंदिरांना बंधमुक्त करण्याची वेळ आली आहे.”  

टॅग्स :Templeमंदिर