मिकी प्रश्नी आयरिश यांचे प्रधानमंत्री मोदी यांना पत्र
By Admin | Updated: August 2, 2015 23:31 IST2015-08-02T23:31:41+5:302015-08-02T23:31:41+5:30
पणजी : सडा कारागृहात असलेले आमदार मिकी पाशेको यांना पॅरोल देण्यासाठी मंत्रिमंडळाची घाईगडबडीत मंजुरी घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा, अशी मागणी करणारे पत्र आयरिश रॉड्रिग्स यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.

मिकी प्रश्नी आयरिश यांचे प्रधानमंत्री मोदी यांना पत्र
प जी : सडा कारागृहात असलेले आमदार मिकी पाशेको यांना पॅरोल देण्यासाठी मंत्रिमंडळाची घाईगडबडीत मंजुरी घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा, अशी मागणी करणारे पत्र आयरिश रॉड्रिग्स यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. मंत्र्यांमध्ये नोट फिरवून मंजुरी घेण्यात आली आणि रातोरात हे सर्व करण्यात आले याकडे आयरिश यांनी लक्ष वेधले आहे. न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीला दया दाखवणे ही गंभीर बाब आहे. मिकी तब्बल दोन महिने फरारी होते. दयायाचनेचा अर्ज केवळ निष्पाप व्यक्तीच्या बाबतीतच करता येतो. मिकींसाठी घटनेच्या 161 कलमाचा गैरवापर करता येणार नाही, असे आयरिश यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)