शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
2
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
3
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
4
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
5
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
6
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
7
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
8
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
9
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
10
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
11
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
12
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
13
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
14
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
15
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
16
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
17
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
18
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
19
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
20
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' जमिनीवर कब्रस्तान, राम मंदिर ट्रस्टला मुस्लिमांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 14:42 IST

देशातील सर्व हिंदू-मुस्लिमांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला आहे.

ठळक मुद्दे'कब्रच्या नावाखाली अडथळा आणला जात आहे'इक्बाल अन्सारींनी सांप्रदायिक सलोख्याचा दिला सल्ला 'ज्याठिकाणी शंख वाजतो आणि पूजा केली जात आहे, त्याठिकाणाचे स्मशान किंवा कब्रस्तान सर्व शुद्ध होते'

अयोध्या : राम मंदिर उभारणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना अयोध्येतील नऊ मुस्लिमांनी राम जन्मभूमी परिसरात नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या मुस्लिमांनी 'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, एकूण 67 एकरमधील 5 एकर जमीन कब्रस्तानची आहे. दरम्यान, या मुस्लीम लोकांच्या दाव्यावर बाबरीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांनी सांप्रदायिक सलोख्याचा सल्ला दिला आहे. 

देशातील सर्व हिंदू-मुस्लिमांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला आहे. आता अशाप्रकारे पत्र लिहून सांप्रदायिकरित्या एक नवीन वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी रामलल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास यांनी सांगितले की, "67 एकर जमिनीवर कोणती कब्र नाही आहे. त्याठिकाणी ऋषींची समाधी होती. कब्रच्या नावाखाली अडथळा आणला जात आहे. ज्याठिकाणी शंख वाजतो आणि पूजा केली जात आहे, त्याठिकाणाचे स्मशान किंवा कब्रस्तान सर्व शुद्ध होते." 

विश्व हिंदू परिषदचे प्रवक्ता शरद शर्मा यांनी सांगितले की, "जे राम मंदिर उभारणीत विविध प्रकारे अडथळा निर्माण करत होते. ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निराश झाले आहेत. हे लोक आता जे सांगत आहेत, त्यासंबंधी काहीच निशाणी 67 एकर जमिनीवर नाही आहे. गेल्या कित्येक वर्षांत मंदिरासाठी झालेल्या संघर्षात हजारो संतानीही आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. अशावेळी जर ज्याठिकाणी तथ्यहीन कब्रस्तान म्हटले जात आहे, तर त्याला संत शहिदा म्हणू शकतो." 

दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने 5 फेब्रुवारीपूर्वी ट्रस्ट स्थापन करावा तसेच मुस्लिमांना मशिदीसाठी अयोध्येत 5 एकर जागा द्यावी, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. त्यानुसार केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी 'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टची स्थापना केली. 

'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' मधील 15 सदस्यांची नावे ...1. के परासरन (सुप्रीम कोर्टातील वकील)2. शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वतीजी (प्रयागराज)3. जगतगुरु मधवाचार्य स्वामी (कर्नाटकमधील पेजावर मठाचे पीठाधीश्वर)4. युगपुरुष परमानंदजी महाराज (अखंड आश्रम प्रमुख, हरिद्वार)5. स्वामी गोविंद देव गिरी (प्रवचनकर्ता)6. विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या राजपरिवाराचे वंशज)7. डॉ. अनिल मिश्र (होमिओपॅथिक डॉक्टर)8. कामेश्वर चौपाल (पटना)9. महंत दिनेंद्र दास (निर्मोही आखाडा , अयोध्या)10. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य11. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य12. केंद्राचा प्रतिनिधी13. राज्याचा प्रतिनिधी14. अयोध्येचे जिल्हाधिकारी15. ट्रस्टी द्वारा नियुक्त अध्यक्ष

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या