भारत आणि पाकच्या विद्यार्थ्यांचे पत्रलेखन
By Admin | Updated: February 15, 2015 23:36 IST2015-02-15T23:36:08+5:302015-02-15T23:36:08+5:30
पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्यात १३६ विद्यार्थ्यांसह १५० लोक मरण पावल्यानंतर, भारत व पाकच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना पत्रे व पोस्टकार्डे पाठविली होती.

भारत आणि पाकच्या विद्यार्थ्यांचे पत्रलेखन
नवी दिल्ली : पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्यात १३६ विद्यार्थ्यांसह १५० लोक मरण पावल्यानंतर, भारत व पाकच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना पत्रे व पोस्टकार्डे पाठविली होती.
...पापा से कहना अब मुझे स्कूल से लेने ना आये, देख नही पाऊंगा उन्हे मेरे जनाझेसे उठके...पप्पाना सांगा शाळेतून घरी नेण्यासाठी येऊ नका, कारण आता मी शवपेटीतून उठून त्यांना पाहू शकणार नाही, असा भावपूर्ण संदेश पाकच्या विद्यार्थ्यांनी पाठविला, तर सीमेवर राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना या हल्ल्याचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले.
या दु:खात भारतीय तुमच्याबरोबर आहोत, असे उत्तर पाठविले. पेशावर येथील लष्करी शाळेवर १६ डिसेंबर रोजी झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील मुलांनी परस्परांना अशी भावनिक साद घातली. (वृत्तसंस्था)