चला मिळुनी सारे घडवुया भारत - पंतप्रधान मोदींचा पहिला संदेश
By Admin | Updated: May 26, 2014 20:12 IST2014-05-26T20:12:45+5:302014-05-26T20:12:45+5:30
आपण सगळे मिळून उज्ज्वल भविष्यासाठी झटुया असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाचे अभिनंदन केले.

चला मिळुनी सारे घडवुया भारत - पंतप्रधान मोदींचा पहिला संदेश
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २६ - ज्यावेळी नरेंदर मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत होते, त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिला संदेश भारतीयांना दिला. आपण सगळे मिळून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटुया असे सांगत मोदींनी संपूर्ण देशाचे अभिनंदन केले. मोदी म्हणाले, की १६ मे २०१४ रोजी भारताने आपला निकाल दिला आणि विकास, सुप्रशासन आणि स्थैर्यासाठी मतदान केल्याचे सिद्ध झाले. भारताला अधिक उंचीवर नेण्यासाठी आम्ही स्वत:ला वाहून घेऊ हे सांगताना जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सहकार्य करावे आणि त्याचप्रमाणे सक्रीय सहभागही द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
आपण सगळे मिळून भारताचे उज्ज्वल भविष्य घडवुया. एका सशक्त, विकसित आणि सर्वसमावेशक असा भारत आपण घडवुया असे आवाहन त्यांनी केले. जागतिक शांततेसाठी व विकासासाठी आपण एकत्र काम करूया असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.