काळ्या पैशांच्या प्रकरणांची वेगाने चौकशी करू -न्या. शहा

By Admin | Updated: May 29, 2014 04:11 IST2014-05-29T04:11:20+5:302014-05-29T04:11:20+5:30

काळ्या पैशांच्या प्रकरणात फार मोठी गुंतागुंत आहे, असे असेल तरी चौकशी वेगाने करण्याचा प्रयत्न केला जाईल,

Let us investigate black money cases faster Shah | काळ्या पैशांच्या प्रकरणांची वेगाने चौकशी करू -न्या. शहा

काळ्या पैशांच्या प्रकरणांची वेगाने चौकशी करू -न्या. शहा

अहमदाबाद : काळ्या पैशांच्या प्रकरणात फार मोठी गुंतागुंत आहे, असे असेल तरी चौकशी वेगाने करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे काळ्या पैशाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम.बी. शहा यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी पहिल्या बैठकीत काळ्या पैशांच्या चौकशीसाठी शहा यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यास मंजुरी दिली. चौकशी आयोग/ समितीचे अहवाल सादर करण्यास विलंब होण्याच्या जुन्या अनुभवाबद्दल विचारले असता, ते म्हणाले, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. ओडिशा आणि गोव्यातील लोह खनिजाचे बेकायदेशीर उत्खननाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचा अध्यक्ष होतो. पहिला अंतरिम अहवाल चौकशी सुरू केल्यानंतर दोन महिन्यांत सादर केला होता. त्यानंतर गोव्याचा अहवाल सहा महिन्यात आणि ओडिशाचा पुढील सहा महिन्यात अहवाल सादर केला होता. त्यामुळे मला विश्वास आहे की, काळ्या पैशांची चौकशी शक्य तितक्या लवकर पूर्ण करू शकेन, असेही शहा म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Let us investigate black money cases faster Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.