शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अयोध्येत वादग्रस्त जागेवर मंदिर बांधू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 1:37 AM

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या वादग्रस्त जागेवर भगवान श्रीरामाचे मंदिर बांधावे आणि तेथून काही अंतरावर मुस्लीम बहुसंख्य वस्तीत मशीद बांधावी, असा तडजोडीचा प्रस्ताव उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमीच्या वादग्रस्त जागेवर भगवान श्रीरामाचे मंदिर बांधावे आणि तेथून काही अंतरावर मुस्लीम बहुसंख्य वस्तीत मशीद बांधावी, असा तडजोडीचा प्रस्ताव उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.डिसेंबर १९९२ मध्ये कारसेवकांनी उद््ध्वस्त करण्यापूर्वी ज्या जागी बाबरी मशीद उभी होती ते भगवान श्रीरामाचे जन्मस्थान असल्याने तेथे राम मंदिर बांधण्यासाठी ती जागा आम्हाला मिळायला हवी, असा हिंदूंचा दावा आहे. या वादग्रस्त जागेची तीन भागांत वाटणी करण्याचा निवाडा अलाहाबाद उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी दिला होता. त्याविरुद्धची अपिले येत्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस यायची आहेत.गेली ७० हून अधिक वर्षे या वादात मुस्लीम समाजाचे प्रतिनिधित्व उत्तर प्रदेशचे सुन्नी वक्फ बोर्ड करत आले आहे. मात्र आता शिया वक्फ बोर्डही या वादात प्रतिवादी म्हणून उतरले आहे. मुळात पाडली गेलेली बाबरी मशिद ही शिया पंथियांची मशीद होती. त्यामुळे वादग्रस्त जागा आमची आहे व सुन्नी वक्फ बोर्डाचा त्या जागेशी काही संबंध नाही, असा दावा शिया बोर्डाने केला आहे.शिया वक्फ बोर्डाची भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र त्यांचे अध्यक्ष वासीम रिझवी यांनी केले आहे. त्यात या बोर्डाने हा वाद शांततेने व आपसात तडजोडीने मिटविण्याची तयारी दर्शविली आहे. त्या संदर्भात बोर्ड म्हणते की, वादग्रस्त जागा आमची असल्याने इतर पक्षकारांच्या संमतीने कसा तोडगा काढावा, हे ठरविण्याचा फक्त आम्हालाच अधिकार आहे. सुन्नी बोर्डाचा याच्याशी काहीही संबंध नाही व ते या तडजोडीस विरोधही करू शकत नाहीत.तडजोडीचा ढोबल प्रस्ताव मांडताना शिया वक्फ बोर्ड म्हणते की, वादग्रस्त जागा हे श्री रामलल्लाचे जन्मस्थान असल्याची हिंदूंची श्रद्धा असल्याने त्याजागी श्रीरामाचे मंदिर बांधले जाण्यास आमची हरकत नाही. पाडल्या गेलेल्या मशिदीच्या बदल्यात मूळ जागेपासून काही अंतरावर मुस्लीम बहुसंख्य वस्तीमध्ये नवी मशिद बांधली जावी.पुरेसे अंतर हवेमात्र मंदिर आणि मशीद या दोन्ही ठिकाणी लावल्या जाणाऱ्या ध्वनिक्षेपकांमुळे परस्परांच्या धार्मिक कार्यात व्यत्यय येऊ नये यासाठी या दोन्हींमध्ये पुरेसे अंतर असावे, असेही शिया वक्फ बोर्डाने सुचविले आहे.