शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

"भारताच्या उभारणीसाठी आणखी कठोर मेहनत करत राहू!"पंतप्रधान मोदी यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 06:41 IST

गरीबांचे जीवन उंचावल्याचा दावा

नवी दिल्ली : ‘आपल्या प्रत्येक निर्णयामागे लोकांचे जीवन सुधारण्याची इच्छा हेच एक कारण आहे. आज आम्ही देशाच्या सेवेला नऊ वर्षे पूर्ण करीत आहोत. मी कृतज्ञ आणि आभारी आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करत राहू,’ अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील त्यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व्यक्त केली.

सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांशी संबंधित आकडेवारी मांडताना मोदींनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले की, “गेल्या ९ वर्षांत आम्ही भारतातील सर्वांत गरीब लोकांचे जीवनमान उंचावण्याचा आणि त्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला. अनेक उपक्रमांद्वारे आम्ही लाखो लोकांचे जीवन बदलले. प्रत्येक नागरिकाच्या उन्नतीसाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे आमचे ध्येय निरंतर आहे.”

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लिहिलेला लेख शेअर केला.सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने प्रचाराचे नियोजन केले आहे. पंतप्रधान मोदी बुधवारी राजस्थानमधील अजमेर येथे सभेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देशभरात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला. देशातील प्रत्येक राज्यात आयोजित पत्रकार परिषदांमध्ये सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला. 

‘शेवटच्या माणसापर्यंत लाभ मिळणार’‘मोदी सरकारने नऊ वर्षांच्या कार्यकाळात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मोदी यांनी त्यांच्या धोरणांमध्ये ‘अंत्योदय’ आणि सेवेचा संकल्प सर्वोपरी ठेवला आहे आणि त्यांचे सरकार हे सुनिश्चित करत आहे की कल्याणकारी योजनांचा लाभ रांगेतील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. ,

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाAmit Shahअमित शाह