जनतेला विमा योजनेचा लाभ मिळू द्या रक्षा खडसे यांनी उपटले बँक अधिकार्यांचे कान : नागरिकांशी उद्धटपणे बोलू नका फक्त अडीच लाख लोकांचा
By Admin | Updated: October 10, 2015 00:45 IST2015-10-10T00:45:37+5:302015-10-10T00:45:37+5:30
जळगाव- केंद्र सरकारने नागरिकांसाठी अपघात व इतर विमा योजना लागू केल्या आहेत. परंतु त्यात सहभाग घेतलेल्या नागरिकांची संख्या मोजकी आहे. बँक कर्मचारी नागरिकांशी उद्धटपणे बोलतात, अशा तक्रारी माझ्याकडे आहेत. नागरिकांशी सन्मानाने वागा आणि विमा योजनेचा लाभ तळागाळात पोहोचवा, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी बँक अधिकार्यांना दिल्या.

जनतेला विमा योजनेचा लाभ मिळू द्या रक्षा खडसे यांनी उपटले बँक अधिकार्यांचे कान : नागरिकांशी उद्धटपणे बोलू नका फक्त अडीच लाख लोकांचा
ज गाव- केंद्र सरकारने नागरिकांसाठी अपघात व इतर विमा योजना लागू केल्या आहेत. परंतु त्यात सहभाग घेतलेल्या नागरिकांची संख्या मोजकी आहे. बँक कर्मचारी नागरिकांशी उद्धटपणे बोलतात, अशा तक्रारी माझ्याकडे आहेत. नागरिकांशी सन्मानाने वागा आणि विमा योजनेचा लाभ तळागाळात पोहोचवा, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी बँक अधिकार्यांना दिल्या. विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकार्यांसोबत शुक्रवारी खडसे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) कार्यालयात बैठक घेतली. या वेळी जि.प.चे सीईओ आस्तिककुमार पांडेय, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक दिलीप ठाकूर व इतर अधिकारी उपस्थित होते. दोन टप्प्यांमध्ये मोहीमविमा योजना काढण्याबाबतची मोहीम प्रथम रावेर लोकसभा मतदारसंघात राबविली जाईल. त्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघात ही मोहीम सुरू होईल, अशी माहिती खडसे यांनी दिली. बँक मित्रांची होईल मदतया मोहिमेसाठी बँक मित्र नियुक्त केले जातील. त्यांची मदत घेऊ. १० गावांसाठी तीन बँक मित्र असतील. तसेच सरपंच व इतर लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून विमा योजनेत नागरिकांचा सहभाग वाढविला जावा, अशा सूचना खडसेंनी दिल्या. २०० रुपये अनामत घ्यावीविमा योजनेचे अर्ज भरून घेताना २०० रुपये अनामत रक्कम घ्यावी. या रकमेतून अपघात विमासंबंधीचे पैसे दरवर्षी कपात केले जातील, अशी माहिती देण्यात आली.