आंध्रला विशेष दर्जा द्या सोनियांचे मोदींना पत्र

By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:44+5:302015-02-21T00:50:44+5:30

हैदराबाद : काँगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची विनंती केली आहे़ शुक्रवारी आंध्र प्रदेश काँग्रेसने मीडियासाठी हे पत्र जारी केले़

Let Andhra Pradesh give special status to Modi by letter of special status | आंध्रला विशेष दर्जा द्या सोनियांचे मोदींना पत्र

आंध्रला विशेष दर्जा द्या सोनियांचे मोदींना पत्र

दराबाद : काँगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची विनंती केली आहे़ शुक्रवारी आंध्र प्रदेश काँग्रेसने मीडियासाठी हे पत्र जारी केले़
पंतप्रधानांना गुरुवारी लिहिलेल्या या पत्रात सोनियांनी आपल्याच एका जुन्या पत्राचाही हवाला दिला आहे़ आंध्र प्रदेश पुनर्गठन कायदा, २०१३ लागू करण्यासंदर्भात २ जून २०१४ लिहिलेल्या माझ्या पत्राकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते, अशा शब्दांत सोनियांनी पत्राची सुरुवात केली आहे़ विभाजनानंतर आंध्र प्रदेशच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण व्हायला हवीत़ तथापि विभाजनाच्या आठ महिन्यानंतरही यासंदर्भात केंद्र सरकारकडून कुठलीही पावले उचलली गेली नाहीत़ तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राज्यसभेत आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची घोषणा केली होती़ या पार्श्वभूमीवर आंध्रला त्वरित विशेष राज्याचा दर्जा दिला जावा, असे सोनियांनी पत्रात लिहिले आहे़
आंध्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष एऩ रघुवीर रेड्डी यांनी गुरुवारी सोनिया आणि मनमोहनसिंग यांची भेट घेतली होती़ काँग्रेस हा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचे त्यांनी यानंतर सांगितले होते़

Web Title: Let Andhra Pradesh give special status to Modi by letter of special status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.