टोलविरोधी आंदोलनाला भाजप नेत्याची पाठ (भाग - २)
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:32+5:302015-01-22T00:07:32+5:30

टोलविरोधी आंदोलनाला भाजप नेत्याची पाठ (भाग - २)
>गरिबांच्या खिशावर दरोडा - शोभाताई फडणवीसबोरखेडी आणि मनसर टोलनाक्यावर करण्यात येत असलेली टोलवसुली हा गरिबांच्या खिशावर दरोडा, असल्याचा आरोप यावेळी शोभाताई फडणवीस यांनी केला. त्या म्हणाल्या, हा प्रोजेक्ट ३५० कोटी रुपयांचा आहे. ओरिएन्टल कंपनीने आतापर्यंत बोरखेडी नाक्यावर वाहनचालकांकडून ७०० कोटी रुपये वसूल केले. हा नाका २०३७ पर्यंत सुरू राहणार आहे. नाक्याच्या २० कि.मी. अंतराच्या परिसरातील नागरिकांकडूनही टोल वसूूल केला जात आहे. शेतीपयोगी वाहने, शेतीमालाची व दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही टोल लावला जात आहे. मनसर टोलनाक्याचा लेखाजोखाही त्यांनी यावेळी मांडला. ओरिएन्टल कंपनीने आतापर्यंत केेलेल्या टोलवसुलीतून खर्चाच्या वसुलीव्यतिरिक्त ३९८.९९ कोटी रुपये जास्तीचे वसूल केले. कंपनीला या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सहकार्य करीत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. कोटशोभाताई फडणवीस यांनी टोलविरोधात आंदोलन केले. नियमापेक्षा अधिकवसूली होत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. यातून सत्य बाहेर येईल.डॉ.राजीव पोतदारजिल्हाध्यक्ष, भाजप