शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश स्टार्टअप कंपन्यांत दहापेक्षाही कमी कर्मचारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 06:54 IST

आरबीआयच्या सर्वेक्षणाचा अहवाल; तीन टक्क्यांकडेच १00हून अधिक मनुष्यबळ

मुंबई : स्टार्टअप कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. पण केवळ १४ टक्के स्टार्टअप कंपन्यांनीच पहिल्या सहा महिन्यांत १0 पेक्षा अधिक कर्मचारी ठेवल्याचे आढळले आहे. व्यवसाय परिपक्व झाल्यानंतरही सुमारे ६0 टक्के स्टार्टअप कंपन्यांकडे १0 पेक्षा कमीच कर्मचारी काम करत आहेत.रिझर्व्ह बँकेने स्टार्टअप क्षेत्राबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. यात देशातील १,२४६ कंपन्यांचा अभ्यास केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, केवळ ३ टक्के स्टार्टअप कंपन्यांकडे १00 पेक्षा जास्त कर्मचारी कामावर आहेत.६३ टक्के कंपन्यांनी आगामी दोन ते तीन वर्षांत २0 नवे कर्मचारी भरण्याचा इरादा बोलून दाखविला. बहुतांश स्टार्टअप कंपन्या सॉफ्टवेअर विकास, आयटी सल्ला/समाधान तसेच आरोग्य सेवा क्षेत्रातील असून, त्या तीन वर्षांमध्ये सुरू झालेल्या आहेत.रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २0१८ आणि एप्रिल २0१९ या कालावधीत हे सर्वेक्षण केले. त्यातून महत्त्वाचे वैशिष्ट्य असे समोर आले की, ७५ टक्के कंपन्या कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली आणि तामिळनाडू या पाच राज्यांतच केंद्रित आहेत.सहा क्षेत्रांमध्ये अधिक कंपन्यास्टार्टअप स्थापन करणाऱ्यांपैकी एकतृतीयांश लोक अभियांत्रिकी शाखेचे आहेत. बहुतांश संस्थापकांना व्यावसायिक अनुभव आहे. ७.३ टक्के संस्थापक विद्यार्थी आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या स्टार्टअप कंपन्यांपैकी सुमारे ५0 टक्के कंपन्या कृषी, डाटा व विश्लेषण, शिक्षण, आरोग्य, आयटी सल्ला/समाधान आणि वस्तू उत्पादन या सहा क्षेत्रांतील आहेत. बहुतांश स्टार्टअपमध्ये दोन संस्थापक आहेत.

टॅग्स :Employeeकर्मचारीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक