शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

यंदा देशात सरासरीपेक्षा कमीच पाऊस: महाराष्ट्रात सामान्य, तर गुजरात, राजस्थानात दुष्काळाची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 07:26 IST

स्कायमेटचा अंदाज: हिंद महासागरातील इंडियन निनोच्या नकारात्मक स्थितीमुळे (आयओडी) पावसाचे प्रमाण कमी झाले असावे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस होण्याची ६० टक्के शक्यता आहे, असे भाकीत स्कायमेटने वर्तविले आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे पुरेशा प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे या राज्यांच्या कृषी उत्पादनावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. गुजरात, राजस्थानच्या पश्चिम भागात दुष्काळ पडण्याची भीती स्कायमेटने वर्तविली आहे.

या चार महिन्यांत दीर्घ कालावधीचे सरासरी पर्जन्यमान ९३ टक्के राहील. यंदा जूनमध्ये सामान्य पातळीपेक्षा अधिक पाऊस पडला. जुलैच्या प्रारंभी पाऊसमान जरा कमी झाले होते. ११ जुलैपर्यंत फार पाऊस पडला नाही. दीर्घ कालावधीच्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत जून व जुलैमध्ये ११० टक्के व ९३ टक्के पाऊस झाल्याचे स्कायमेटने म्हटले. 

ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यातही कमी पाऊस झाला आहे. त्या स्थितीत अद्याप सुधारणा झालेली नाही. गुजरात, राजस्थान, ओडिशा, केरळ, ईशान्य भारतात त्यामुळे कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

सप्टेंबरमध्येही चित्र वेगळे नसण्याची शक्यताnऑगस्टमध्ये दीर्घ कालावधीचे सरासरी पर्जन्यमान २५८.२ मिमी गृहीत धरण्यात आले आहे. त्यापेक्षा कमी पाऊस होण्याची ८० टक्के शक्यता आहे. तर सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस होण्याची २० टक्के शक्यता आहे. nसप्टेंबरमध्ये दीर्घ कालावधीचे सरासरी पर्जन्यमान १७०.२ मिमी गृहीत धरले असून या महिन्यात सामान्य पातळीचा पाऊस होण्याची शक्यता ६० टक्के, सामान्य पातळीपेक्षा अधिक व सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता प्रत्येकी २० टक्के आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे.

ग्रीनलँडवर प्रथमच मुसळधार पाऊसग्रीनलँडच्या इतिहासात प्रथमच त्याच्या सर्वोच्च बर्फाळ शिखरावर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे वैज्ञानिकांना वाटणारी काळजी वाढली आहे. या पावसाचे पाणी सात कोटी टन पडले. 

निनोची नकारात्मक स्थिती

टॅग्स :Rainपाऊस