शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणात खेळणाऱ्या ४ वर्षाच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला, रुग्णालय गाठण्याआधीच मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 08:53 IST

Leopard Attack: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगणात खेळत असलेल्या अनुष्कावर उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने झडप घातली आणि तिला ओढत नेले.

उत्तर प्रदेशातील बहराइच येथे बिबट्याच्या हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अंगणात खेळणाऱ्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला, या हल्ल्यात चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह तिच्या घरापासून सुमारे ५० मीटर अंतरावर आढळून आला. ही घटना कतरनियाघाट वन्यजीव विभागाच्या निशाणगड रेंज अंतर्गत येणाऱ्या रामपुरवा ग्रामपंचायतीच्या मुखिया फार्म गावात घडली. 

निशाणगड रेंजमधील रामपुरवा ग्रामपंचायतीच्या मुखिया फार्म गावात ही घटना घडली. स्थानिक रहिवासी मनोज यांची चार वर्षांची मुलगी अनुष्का आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. यावेळी जवळच असलेल्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. बिबट्याने अनुष्काला ओढत घरापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या कालव्याजवळील झुडपात नेले.

कुटुंबियांनी आरडाओरड करत मुलीचा शोध घेतला असता ती जखमी अवस्थेत सापडली. तिच्या मानेला आणि गळ्याला बिबट्याने गंभीर जखमा केल्या होत्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनुष्काला कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात नेले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून संतप्त गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. कतरनियाघाट वन्यजीव अभयारण्य जवळच असल्याने वन्य प्राणी वारंवार मानवी वस्तीत घुसतात. या भीषण घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत असून, नागरिकांनी संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाने या परिसरात गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard attacks, kills 4-year-old girl playing in courtyard.

Web Summary : In Bahraich, Uttar Pradesh, a leopard attacked and killed a four-year-old girl playing outside her home. The incident occurred near the Katarniaghat Wildlife Sanctuary, sparking fear and anger among villagers who are demanding increased patrols and the capture of the leopard.
टॅग्स :Leopard Attackबिबट्याचा हल्लाUttar Pradeshउत्तर प्रदेश