पान ४ कुमठा येथे सरकारी कार्यक्रमावर आमदारांचा बहिष्कार

By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:03+5:302015-05-05T01:21:03+5:30

कारवार : मानापमानाच्या नाटकात सरकारी कार्यक्रमावर काँग्रेसच्या आमदारांनी बहिष्कार टाकून निघून गेल्याची घटना कुमठा येथे घडली. पक्षाच्या कार्यक्रमातील आमदारांच्या वर्तनाची चर्चा परिसरात सुरू होती.

Legislators boycott at government program at Kumaon | पान ४ कुमठा येथे सरकारी कार्यक्रमावर आमदारांचा बहिष्कार

पान ४ कुमठा येथे सरकारी कार्यक्रमावर आमदारांचा बहिष्कार

रवार : मानापमानाच्या नाटकात सरकारी कार्यक्रमावर काँग्रेसच्या आमदारांनी बहिष्कार टाकून निघून गेल्याची घटना कुमठा येथे घडली. पक्षाच्या कार्यक्रमातील आमदारांच्या वर्तनाची चर्चा परिसरात सुरू होती.
गरिबांना मोफत तांदूळ देण्याची योजना तसेच महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी रेडिमेड कपडे तयार करण्याच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कुमठा तालुक्यातील हेगडे येथे आयोजित केले होते. या वेळी कुमठ्याच्या आमदार शारदा शे˜ी (काँग्रेस), जिल्हा पालक मंत्री आर.व्ही. देशपांडे आदी उपस्थित होते.
या वेळी आ. शे˜ी जिल्हा पालक मंत्री देशपांडे यांना म्हणाल्या की, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी डॉ. रामप्रसाद मनोहर हे कुमठा क्षेत्रात हस्तक्षेप करत आहेत. कुमठा तालुक्यातील कुजळ्ळीचे ग्रामविकास अधिकारी शिवानंद जोयस हे उत्तम कार्य करतात. कुजळ्ळी बरोबर ते तोरसे ग्रमपंचायतीचेही काम पाहत होते. मात्र, कार्यनिर्वाहक अधिकार्‍यांनी एकाएकी त्यांची गोकर्ण ग्रामपंचायतीत बदली आम्हाला न विचारता केली. आम्ही त्यांना बदली न करण्याची विनंती केली होती; परंतु आमच्या विनंतीला काडीचीही किंमत न देता अखेर बदली केली.
या वेळी जिल्हा पालक मंत्री देशपांडे यांनी डॉ. मनोहर यांना ग्रामविकास अधिकार्‍याची नेमणूक पुन्हा तोरसे येथे करा, अशी सूचना केली. मात्र, सर्व ग्रामपंचायतींना अनुकूल होईल अशा ग्राम विकास अधिकार्‍यांच्या नेमणुका केल्या आहेत, असे प्रत्युत्तर डॉ. मनोहर यांनी दिले. त्यावर देशपांडे म्हणाले की, या भागातील आमदारांच्या मताप्रमाणे चला, त्यांच्या सल्ल्याने अधिकार्‍यांच्या नेमणुका करा. यावर डॉ. मनोहर आ. शे˜ींना म्हणाले की, तुमच्या सूचनेप्रमाणे यापुढे निर्णय घेऊ.
या वेळी शारदा शे˜ींनी हा आपला अपमान समजत आताच्या आता ग्रामविकास अधिकार्‍याच्या बदलीचा (पी.डी.ओ) आदेश जारी करावा असा ह˜ धरला. त्यावर असे लोकांच्यासमोर वागणे बरोबर नव्हे अशी समजूत काढण्याचा प्रयत्न देशपांडेंनी केला. मात्र, बदलीचा आदेश दिला नाही तर आपण व्यासपीठावर बसणार नाही असे म्हणत आमदार तरातरा निघून गेल्या. या वेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष भीमण्णा नाईक, माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष एल.व्ही. शानभाग व इतर पक्षनेत्यांनी आमदार शे˜ी यांच्या कारपर्यंत जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या म्हणण्याला किंमत दिली नाही हा राग अनावर झाल्याने आमदार कोणाचेही न एकेता निघून गेल्या.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या आमदार असून पक्षाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने सर्वांसमक्ष काँग्रेसजनांना खजील होण्याची वेळ आल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Legislators boycott at government program at Kumaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.