प्रश्नोत्तराच्या तासाला विधानसभेत पॉर्न पाहत होता आमदार
By Admin | Updated: December 15, 2015 13:51 IST2015-12-15T13:51:57+5:302015-12-15T13:51:57+5:30
ओडिशा विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरु असताना काँग्रेसचा एक आमदार चक्क पॉर्न क्लिप बघण्यामध्ये दंग असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

प्रश्नोत्तराच्या तासाला विधानसभेत पॉर्न पाहत होता आमदार
ऑनलाइन
भुवनेश्वर, दि. १५ - ओडिशा विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरु असताना काँग्रेसचा एक आमदार चक्क पॉर्न क्लिप बघण्यामध्ये दंग असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या सभागृहाकडून जनता नैतिकतेची अपेक्षा करते, त्याच सभागृहात एका आमदाराने चक्क आपली लैंगिकविकृती दाखवून दिली.
नाबा किशोर दास असे या आमदाराचे नाव असून, ओडिशा विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी यांनी त्या आमदाराला सात दिवसांसाठी निलंबित केले आहे. पुढील चौकशीसाठी विधानसभाअध्यक्षांनी हे प्रकरण नैतिकता समितीकडे पाठवले आहे. स्थानिक वृत्तवाहिनी सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासाच्या कामकाजाचे प्रक्षेपण करत असताना नाबा दास हा आमदार पॉर्नक्लिप बघत होता.
मला माझ्या सोशल मिडियाचे पेज ओपन करायचे होते पण चुकून माझ्याकडून युटूब ओपन झाले. त्याचवेळी टीव्ही कॅमे-याने माझे चित्रीकरण केले. मी निर्दोष आहे असे आपला बचाव करताना नाबा दास म्हणाले. उद्या चौकशी झाली तर मी, दोषमुक्त बाहेर येईन असा दावाही त्यांनी केला. नाथा दास झारसुगुडा विधानसभा मतदारसंघातून दुस-यांदा आमदार म्हणून निवडून विधानसभेत आले आहेत. २०१२ मध्ये कर्नाटक विधानसभेत दोन मंत्र्यांना पॉर्न बघताना पकडले होते.