पात्र वारसांना मिळाला न्याय
By Admin | Updated: January 26, 2016 00:04 IST2016-01-26T00:04:49+5:302016-01-26T00:04:49+5:30
जळगाव : लाड कमिटीच्या शिफारशीनुसार पात्र ३१ वारसांना सोमवारी सफाई कर्मचारी पदासाठी नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

पात्र वारसांना मिळाला न्याय
ज गाव : लाड कमिटीच्या शिफारशीनुसार पात्र ३१ वारसांना सोमवारी सफाई कर्मचारी पदासाठी नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. गेल्या एक वर्षापासून मनपात कार्यरत असलेल्या सफाई कर्मचार्यांच्या वारसांना कामावर सामावून घ्यावे, यासाठी सफाई कर्मचारी संघटना व पदाधिकार्यांतर्फे मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर कर्मचार्यांना न्याय मिळाला असून सोमवारी त्यांना नियुक्ती पत्र महापौर राखी सोनवणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी उपायुक्त प्रदीप जगताप, उपमहापौर सुनील महाजन उपस्थित होते.