शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 15:51 IST

खरे तर, घटस्फोटित कोट्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोट मागितला होता. पण...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत घटस्फोटाच्या कोट्याचा लाभ मिळवण्यासाठी एका महिलेने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या पहिल्याच वाढदिवासाच्या दिवशी या महिलेने पतीला घटस्फोट मागितला आहे. पतीने घटस्फोटाचे कारण विचारले असता, आपल्याला यूपीएससी परीक्षेत घटस्फोटित कोट्याचा लाभ मिळेल आणि यासाठीच आपण लग्न केले होते, असे तीने म्हटले आहे.

खरे तर, घटस्फोटित कोट्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोट मागितला होता. मात्र तेव्हा, पती आणि इतर नातलगांनी समजावल्यानंतर प्रकरण शांत झाले होते. पण, वर्षभरानंतर पत्नीने पुन्हा पतीपासून वेगळे होण्याचा आग्रह धरला. तिच्या हट्टापुढे नातलग आणि पतीलाही नमते घ्यावे लागले आणि घटस्फोटावर सहमती झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या मंगलम सिटीमध्ये राहणाऱ्या कुणालने प्रतापगडच्या तरुणीसोबत लग्न केले होते. वर्षभरापूर्वी प्रतापगडमध्ये लग्न केल्यानंतर, नवरदेव आपल्या नातलगांसह जयपूरला पोहोचला. यानंतर दुसऱ्याच दिवशी नवरीने घटस्फोट मागीतला. दोन्ही पक्षाच्या लोकांनी कसे तरी हे प्रकरण सोडवले. मात्र, लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, दोन दिवसांपूर्वी तरुणीने पुन्हा घटस्फोट मागितला.

हुंड्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी - महत्वाचे म्हणजे, पतीने घटस्फोट देण्यास नकार दिल्यानंतर, पत्नीने त्याला हुंड्याचा खोटा गुन्हा आणि नातेवाईकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच घटस्फोट दिल्यास, या कोट्यात नोकरी मिळेल, असेही ती म्हणाली. तिला यूपीएससीच्या घटस्फोट कोट्यातून नोकरी मिळवायची आहे. यानंतर पती कुणालने जयपूर पोलिसांत तक्रार दाखल केली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नही. म्हणून त्याने जयपूर जिल्हा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर, करधनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार