जेएनयूमध्ये पुन्हा डाव्यांचेच वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:06 AM2019-09-19T06:06:59+5:302019-09-19T06:07:05+5:30

- सुरेश भुसारी नवी दिल्ली : देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा डाव्यांची सत्ता आली असून, ...

The Left dominates again at JNU | जेएनयूमध्ये पुन्हा डाव्यांचेच वर्चस्व

जेएनयूमध्ये पुन्हा डाव्यांचेच वर्चस्व

Next

- सुरेश भुसारी
नवी दिल्ली : देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा डाव्यांची सत्ता आली असून, त्यात एका मराठी युवकाने आपली नाममुद्रा उमटविली आहे. मूळचा नागपूरचा असलेला साकेत मून उपाध्यक्षपदी निवडून आला
आहे.
जेएनयूमध्ये डाव्या पक्षाचा प्रभाव असलेल्या स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाचे (एसएफआय) वर्चस्व कायम राहिले आहे.
साकेतला सर्वाधिक ३,३६५ मते (५८.७ टक्के ) मिळाली. साकेतने अभाविपच्या श्रुती अग्निहोत्रीचा पराभव केला.
अध्यक्षपदी निवडून आलेल्या एशे घोष हिला ४०.४ टक्के मते मिळाली. संयुक्त सचिवपदी निवडून आलेल्या मोहम्मद दानिश याला ५७.५ टक्के मते मिळाली आहेत.
जवळपास १५ वर्षांनंतर मराठी विद्यार्थ्याला जेएनयूमध्ये यश मिळाले आहे. नागपुरातून पदवी घेतलेल्या साकेतने एम. ए. करण्यासाठी जेएनयूची वाट धरली. एम. फिल. केल्यानंतर तो पीएच. डी. करीत आहे.
>लढा सुरू राहील
नागपुरातील दलित चळवळीचा वारसा लाभलेल्या साकेत मूनने ‘लोकमत’ला सांगितले की, जेएनयूला देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे. मात्र या संस्थेची बदनामी करण्याचे कारस्थान गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे.
सध्या सरकारमध्ये बसलेल्या व्यक्ती त्यात सहभागी आहेत. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देशद्रोही व तुकडे-तुकडे गँगचे म्हणून हिणवले जात आहे; पण या लोकांविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील.

Web Title: The Left dominates again at JNU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.