शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

केरळमध्ये पुन्हा डावे, काँग्रेसमध्येच घमासान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 05:15 IST

भारतीय जनता पक्षाला चमत्काराची आशा; जातीय समीकरणेच ठरणार प्रभावी

- पोपट पवार लोकमत न्यूज नेटवर्क तिरुवनंतपूरम : केरळमध्ये उन्हाळ्यात विधानसभा निवडणुकीने वातावरण तापले आहे. कर्नाटक वगळता दक्षिणेत हाती काही न लागलेल्या भाजपने हिंदुत्वाचे लोण केरळमध्ये आणून चमत्काराची आशा बाळगली असली तरी कित्येक दशके आलटून-पालटून सत्ता गाजविलेली माकपप्रणीत डावी आघाडी आणि काँग्रेसप्रणीत यूडीएफ यांच्यातच घमसान होणार आहे.गेल्या निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या डाव्या आघाडीने यूडीएफला पराभूत करून सत्ता ताब्यात घेतली. एलडीएफने १४० पैकी ९१ जागा मिळविल्या, तर यूडीएफला ४७ जागांवर यश मिळाले. भाजपने ९८ जागा लढवल्या; पण एकच विजयी झाला. यंदा मात्र भाजपने अनेक दिग्गजांना पक्षात घेत शिडात चांगलीच हवा भरली आहे.गेल्या काही वर्षांपासून केरळात जातीय ध्रुवीकरण केले जात आहे. केरळध्ये ४७ टक्के जनता ख्रिश्चन व मुस्लीम आहे. ख्रिश्चन काँग्रेस व डाव्यांमध्येच विभागले असले तरी आता ते भाजपकडेही आकृष्ट होत असल्याने दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. शबरीमाला प्रकरणावरून भाजपने डावे व काँग्रेसची मते खेचण्याचा प्रयत्न केला. 

डावे विक्रम करतील?केरळमध्ये १९८० पासून ४० वर्षे कोणत्याच पक्षाला सलग दोनदा सत्तेवर येता आले नाही. मतदार प्रत्येक पाच वर्षांनंतर सत्तेचा कौल दुसऱ्या पक्षाच्या हाती देतात. ही परंपरा  डावी आघाडी दुसऱ्यांदा सत्तेवर येऊन खंडित करणार का, याकडे लक्ष आहे.

गेल्या वेळचे बलाबलडावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) : माकपा : ५८, भाकप : - १९, जनता दल (सेक्युलर) : ३, राष्ट्रवादी : २, अपक्ष - ५, काँग्रेस (सेक्युलर) - १, केरळ काँग्रेस (बी) - १, एनएससी - १, सीपीएम - १,संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) : काँग्रेस-२२, मुस्लीम लीग - १८, केरळ काँग्रेस (मणी) - ६, केरळ काँग्रेस (जेकब) - १

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेस